शेती विषयक सर्व साहित्य व अवजारे मिळणार एकाच ठिकाणी
नाशिक मिरर : वेबटीम नाशिक शहरातील आडगाव ओझर रोड येथे आर.एल ऍग्रो या शेती साहित्य कारखान्याचे उद्धघाटन दि ३० ऑक्टोबर रोजी विंचूर येथील गीता आश्रमाचे महंत श्री भिंगारकर बाबा यांच्या हस्ते कंपनीचा शुभारंभ करण्यात आला.शेतकरी बांधवाना एकाच छताखाली शेतीसाठी आवश्यक सर्व शेतकीय साहित्य , सर्व कृषी अवजारे चे उत्पादन करून सर्व सामान्य शेतकऱ्याला परवडेल अशा किंमतीत वस्तू व सेवा पुरवल्या जाणार आहेत. व विक्री करणार असल्याचे माहिती आर. एल. ऍग्रोचे संचालक लक्ष्मण निकम यांनी केले. तसेच महंत श्री भिंगारकर बाबा यांनी जय जवान जय किसान चा नारा देत फलकाचे अनावरण केले.
कार्यक्रमाला उपस्थित असलेले प्रसिद्ध कबड्डी प्रशिक्षक व प्रगतशील शेतकरी दत्ता गायकवाड यांनी फीत कापून कारखान्याचे उद्धघाटन केले.

उपकरणाची गुणवत्ता सतत टिकून ठेवून शेतकऱ्यांना सर्व वस्तू व अवजारे रास्त किंमतीत तसेच शेती अवजारे घेण्यासाठी विविध कंपनी फायनान्स व बँकाचे लॉन उपलब्ध करून दिले जाणार आहे.तसेच शासनाच्या शेती विषयी सरकारी योजनाचा शेतकऱ्यांना फायदा मिळवून दिला जाणार आहे. अशी माहिती सहसंचालक रमेश भाग्यवन्त यांनी दिली. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या श्रम मंत्रालयाच्या प्रकल्प संयोजिका सारिका डफरे, शेती तज्ञ गुणवंत डफरे, पंकज प्लास्टिक चे पंकज मराठे ,रत्नकन्या सेवाभावी संस्थेच्या उपाध्यक्ष ललिता शिंदे
आडगाव येथील प्रसिध्द शेतकरी कैलास जाधव उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी कंपनीचे व्यवस्थापक स्वप्नील निकम यांनी प्रयत्न केले.
