नाशिक मिरर वेबटीम – दिवाळी सणात प्लास्टिक बनवणारे आणि त्यांचा वापर करणार्या व्यापारी आणि उत्पादकांवर कारवाई करण्याचा इशारा नाशिक महानगरपालिकेने दिला आहे.

सणासुदीच्या हंगामात एकदा वापरल्या जाणार्‍या प्लास्टिकचा वापर वाढण्याची भीती मनपा प्रशासनाला आहे.
मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी अधिकारी यांना दोषींवर दंड आकरणी व्यतिरिक्त पोलिसांकडे तक्रार करण्याचे निर्देश दिले आहेत.
पहिल्यांदा एखाद्याला पकडल्यास पाच हजार रुपये दंड आणि दुसरा वेळी दहा हजार रुपये दंड ठोठावला जाईल. एखाद्यास तिसर्‍यांदा बंदी घातलेल्या प्लास्टिकचा वापर आढळल्यास पोलिस तक्रारी दाखल केल्या जातील.
गेल्या 12 महिन्यांत मनपाने 127 व्यापारयाना प्लास्टिक बंदीच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल 6.5 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

घरा मधुन एकदा वापर होणारे प्लास्टिक गोळा करण्यासाठी महापालिकेने विशेष मोहीम सुरू केली असून लवकरच सहा संकलन केंद्रे सुरू केली जातील.
महापालिकेच्या अधिका-यानी सांगितले की, “नाशिक शहरातील मोकळ्या जागांवर, नद्या व नाल्यांमध्ये रस्त्यावर टाकलेले प्लास्टिक गोळा करण्याच्या सूचना आम्हाला देण्यात आल्या आहेत.

Don`t copy text!