जळगाव : नाशिक मिरर। एकनाथराव खडसे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतात राष्ट्रवादीच्या युवा कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषदेसमोर तर मुक्ताईनगर येथे भुसावळ रोडवर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली यावेळी मुक्ताईनगर येथे शिवसैनिक व नाथाभाऊ समर्थक यांच्या मध्ये ढकलाढकली झाल्याचे समजते मात्र यासंदर्भात पोलिसांना विचारणा केली असता असा काहीही प्रकार झाले नसल्याचे त्यांनी सांगितले
एकनाथराव खडसे यांनी भाजपला रामराम करून घड्याळ हत्यार बांधतात मुक्ताईनगर येथे खर्च समर्थकांनी एकच जल्लोष केला यावेळी त्यांनी भुसावळ कडे जाणाऱ्या रस्त्यावर फटाक्यांची आतिषबाजी केली याच रस्त्यावर विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील यांचे घर असल्यामुळे शिवसैनिक व नाथाभाऊ समर्थक यांच्यामध्ये बाचाबाची झाल्याचे समजते तर प्रत्यक्षदर्शीने सांगितले की पोलीस याठिकाणी आले होते मात्र पोलीस स्टेशन संपर्क साधला असता ठाणे अंमलदार संजीव पाटील यांनी असा काही प्रकार घडलेला नाही अशा प्रकारचा कोणताही गुन्हा नोंद झालेला नाही असे प्रतिनिधीला सांगितले
तर जळगाव येथे जिल्हा परिषदेसमोर राष्ट्रवादी युवा काँग्रेस च्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी केली व खडसे राष्ट्रवादीत आल्यामुळे आनंद व्यक्त केला
