नाशिक मिरर वेबटीम : महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख पदी नाभिक कृती समितीचे अध्यक्ष संजय गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली.तसेच जिल्हा कार्याध्यक्षपदी रमेश आहेर तर उपजिल्हाध्यक्ष पदी संतोष रायकर यांची निवड करण्यात आली.महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या प्रमुख कार्यकारिणीच्या बैठकीत यावेळी एकमताने निर्णय घेण्यात आला.यावेळी प्रदेशाध्यक्ष दत्तात्रय अनारसे, प्रदेश कार्याध्यक्ष अंबादास पाटील, प्रदेश सरचिटणीस दिलीप अनथेॅ,विशेष निमंत्रित नारायण यादव, प्रदेश उपाध्यक्ष अशोक सुर्यवंशी, यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.नवनियुक्त संपर्कप्रमुख म्हणाले, उत्तर महाराष्ट्राची मोठी जबाबदारी दिल्यामुळे नाभिक बांधवांना महामंडळाच्या ध्येय धोरणानुसार आणि महामंडळाचे संस्थापक हणमंतराव साळुंखे यांच्या विचाराने संघटन, प्रबोधन आणि परिवर्तन हे मजबूत करण्याचा प्रयत्न केला जाईल. नाशिक,धुळे,नंदुरबार, जळगाव, अहमदनगर या पाचही जिल्ह्यामध्ये येत्या काळात संघटना मजबूत करण्यास भर दिला जाईल.. आणि सगळ्यांना एका छताखाली घेऊन नाभिक समाजामध्ये नव परिवर्तनाची सुरुवात करून समाजाला योग्य न्याय आणि दिशा देण्याचा प्रयत्न सर्वानुमते करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.यावेळी उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष अरुण सैंदाणे, जिल्हाध्यक्ष सुरेश सुर्यवंशी, महानगरप्रमुख नाना वाघ, नितीन वाघ, बाळासाहेब बिडवे, मनोहर कोल्हळकर मनोहर, शांताराम जाधव आदी उपस्थित होते.
