नाशिक मिरर वेबटीम : राज्यात सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या छावा क्रांतीवीर सेने मध्ये मुंबई विभागातील अंधेरी पश्चिम येथील सामाजिक कार्यकर्त्यांचा प्रवेश सोहळा, संघटनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांच्या उपस्थितीत प्रदेश मुख्य कार्यालय येथे संपन्न झाला. यावेळी संघटनेत नव्याने प्रवेश घेतलेल्या कार्यकर्त्यांनी लवकरच मुंबई मध्ये मोठ्या प्रमाणात शाखा उदघाटन करणार असल्याची माहिती दिली.
या छोटेखानी प्रवेश सोहळ्याप्रसंगी छावा क्रांतिवीर सेनेचे युवा प्रदेशाध्यक्ष शिवा तेलंग, प्रदेश महासचिव शिवाजी राजे मोरे यांनी उपस्थिती होते. यावेळी उपस्थित नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना संघटनेची माहिती व नियमावली,ध्येयधोरणे ही समजून सांगण्यात आली.  नवनियुक्त पदाधिकारी यांच्या माध्यमातून लवकरच मुंबई येथे कार्यक्रम घेणार असून त्याच्या तारखेची घोषणा देखील करण्यात आली.

नवनियुक्त पदाधिकारी :
अंधेरी पश्चिम शहराध्यक्ष – दिनेश आनंद खडतरे

अंधेरी पश्चिम शहर कार्याध्यक्ष – दुर्गेश किशोर कामतेकर,

अंधेरी पश्चिम संपर्कप्रमुख – रमेश रामचंद्र पांडे

बातम्या

Don`t copy text!