सातपूर : नाशिक मिरर वेबटीम सातपूर कॉलनी मधील आंनद छाया समोरील सतत रहदारी ने व्यस्त असणाऱ्या साई सर्कल जवळ रस्त्याच्या मधोमध मंगळवार दि.१० रोजी रस्त्याला अचानक मोठे भगदाड पडल्याची घटना घडली आहे. प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी दुपारी १ सुमारास अचानक जमीन हलत रस्ता खचत रस्त्यावर मधोमध मोठा खड्डा पडला आहे. सुदैवाने रस्त्यावर वाहतूक नसल्याने अपघात घडला नाही. आनंद छाया रोडवर रस्ता डांबरीकरण करतांना योग्य प्रकारे भराव न टाकल्याने या आधीही या ठिकाणी रस्त्यावर मोठे खड्डे पडून अपघाताच्या घटना घडल्या आहे. सातपूर भागांतील महत्वाचा रोड असून त्र्यंबकेश्वर रोड सह ,अशोकनगर,सावरकर नगर ,पपया नर्सरी ,जोडणारा हा मुख्य रस्ता असल्याने योग्य पद्धतीने भराव टाकत रस्ता बनविण्यात यावा अशी मागणी नागरिक व परिसरातील सामाजिक कार्यकर्ते रवींद्र देवरे यांनी केली आहे.

सातपूर : १.भगदाड अशा प्रकारे तात्पुरते स्वरूपात मुरूम टाकून भुजवले आहे.
