नाशिक मिरर वृत्तसेवा :

नाशिक शहरातील पाथर्डी फाटा येथील गेटवे हॉटेलमध्ये ‘विंटर कार्निव्हल २०२५’ या भव्य मनोरंजनात्मक उपक्रमाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. हा कार्निव्हल २४ ते २८ डिसेंबर २०२५ या कालावधीत दररोज सायंकाळी ४ ते रात्री १० वाजेपर्यंत सर्व नाशिककरांसाठी खुला राहणार आहे.

हिवाळ्याच्या सुट्ट्यांचा आनंद कुटुंबासोबत साजरा करण्यासाठी हा कार्निव्हल एक आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व वयोगटांसाठी विविध मनोरंजनात्मक उपक्रमांची रेलचेल या ठिकाणी पाहायला मिळत आहे.

कार्निव्हलमध्ये लहान मुलांसाठी खेळती ट्रेन, कार्टून कॅरेक्टर्स, मास्कॉट्स, विविध खेळांचे स्टॉल्स, टॉल मॅन आणि जुगलर यांसारखी खास आकर्षणे ठेवण्यात आली आहेत. तर युवक व प्रौढांसाठी एमएच १५ बँडचे लाईव्ह परफॉर्मन्स, कॅरोल सिंगिंग, फ्ली मार्केट, सजावटीच्या वस्तूंचे स्टॉल्स तसेच विविध चविष्ट खाद्यपदार्थांचे स्टॉल्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

या भव्य उपक्रमाचे आयोजन गेटवे ताज यांच्या वतीने करण्यात आले असून, संपूर्ण व्यवस्थापनाची जबाबदारी ज्युपिटर इव्हेंट्स आणि फिझ्मा सोल्यूशन टीम यांनी यशस्वीपणे पार पाडली आहे.

या ‘विंटर कार्निव्हल २०२५’ला मिनका रिव्हरडेल, वासन टोयोटा, फ्रावशी टाउन अकॅडमी आणि आर. के. ग्रुप (ब्रँडेड स्टोअर्स) यांचे मुख्य प्रायोजकत्व लाभले आहे.

सणासुदीच्या काळात कुटुंबासोबत आनंद, मनोरंजन, खरेदी आणि खाद्यसंस्कृतीचा अनोखा अनुभव देणारा हा विंटर कार्निव्हल नाशिककरांनी आवर्जून भेट द्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

बातम्या

Don`t copy text!