नाशिककरांकडून सिमोल्लंघन करत शिवजयंती साजरी

नाशिक मिरर वृत्तसेवा : परदेशातही आपल्या संस्कृतीचा आणि इतिहासाचा अभिमान जपणाऱ्या नाशिककरांनी श्रीलंकेच्या भूमीत छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९६ वी जयंती उत्साहात साजरी करत महाराट्राच्या भूमितील राज्याची किर्ती जगाला दाखवून दिली. श्रीलंकेची राजधानी कोलम्बो येथे मनसे प्रदेश उपाध्यक्ष सलीम शेख यांच्या अध्यक्षतेखाली हा उत्सव साजरा करण्यात आला.

सातपूर येथे गेल्या ९ वर्षांपासून “एक गाव,

एक महोत्सव ” हा उपक्रम राबवण्यात येतो. या महोत्वावाचे आजीवन सदस्य असलेले माजी नगरसेवक सलीम मामा शेख व संजय जाधव हे आपल्या मित्र परिवारासह श्रीलंकेत पर्यटनासाठी गेले होते. आपण शिवजन्मोत्सवासाठी उपस्थित राहणार नसल्यामुळे त्यांनी श्रीलंकेतच छत्रपतींची जयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला. श्रीलंकेची राजधानी कोलम्बो येथे त्यांनी छत्रपतोंची प्रतिमा उपलबद्ध करुन घेत गुरुवारी (दि. १९) शिवजयंती साजरी केली. यावेळी ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणा देण्यात आल्या. हा अनोखा सोहळा पाहण्यासाठी स्थानिक श्रीलंकन नागरिकांसह परदेशी पर्यटकही उपस्थित होते. यावेळी अनेकांनी शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल अधिकची माहिती जाणून घेतली. या उपक्रमात माजी नगरसेवक सलीम शेख यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते संजय जाधव, पत्रकार वसंत आव्हाड, मनोज घोणे,, नाशिक महानगरपालिकेचे सेवानिवृत्त अधिकारी सुभाष आहेर, उद्योजक राहुल जाजू, गणेश पवार, तामिळनाडूचे उद्योगपती श्रीती, उमा वल्लीपण यांच्यासह अन्य देश विदेशातील पर्यटक सहभागी झाले होते.

परदेशातही शिवजयंती साजरी करून आपल्या संस्कृतीची पताका फडकावल्याबद्दल या गटाचे स्थानिक श्रीलंकन नागरिकांकडून कौतुक करण्यात आले. हा उपक्रम केवळ जयंती साजरी करण्यापुरताच मर्यादित न राहता, स्वराज्याची प्रेरणा सीमापार पोहोचवणारा ठरला. परदेशात असतानाही आपल्या इतिहासाशी असलेली नाळ जपणाऱ्या नाशिककरांनी खऱ्या अर्थाने ‘शिवभक्ती’चा जागर घातला.

 

छत्रपतींचे कार्य संपूर्ण जगाला माहित आहे. त्यांच्या जयंती उत्सवाला आम्ही आपल्या भूमीत उपस्थित राहू शकलो नसल्यामुळे इथेच जयंती साजरा करण्याचा निर्णय घेतला. 

“या अनोख्या आणि प्रेरणादायी जयंती सोहळ्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यगाथा आंतरराष्ट्रीय स्तरावरही पोहोचल्याची अभिमानास्पद भावना मनात दाटली आहे.”

— सलीम शेख, प्रदेश उपाध्यक्ष, मनसे

बातम्या

Don`t copy text!