नाशिक मिरर वृत्तसेवा :

नाशिक शहरातील नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना समोर आली आहे. जलवाहिनी गळती तसेच दुरुस्तीच्या कामामुळे शनिवारी (२३ मे) सातपूर आणि नाशिक पश्चिम विभागातील अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. या कामामुळे नागरिकांना तात्पुरत्या गैरसोयीचा सामना करावा लागू शकतो.

महानगरपालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, जलवाहिनी दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आले असून काम सुरळीत पूर्ण करण्यासाठी काही भागांतील पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सातपूर विभाग (प्रभाग ८, ९ आणि १०) मधील प्रभावित भाग:

सावरकरनगर, आनंदवल्ली, सोमेश्वर कॉलनी, श्रमिकनगर, शिवाजीनगर, ध्रुवनगर, अशोकनगर तसेच परिसरातील इतर भागांमध्ये शनिवारी पाणीपुरवठा होणार नाही.

नाशिक पश्चिम विभाग (प्रभाग ७) मधील प्रभावित भाग:

माणिकनगर, डॉन बास्को, श्रमिकनगर, चैतन्यनगर, आकाशवाणी टॉवर परिसर, सुयोजित गार्डन आणि आसपासच्या भागांमध्येही पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

प्रशासनाच्या माहितीनुसार, प्रभावित भागांमध्ये रविवारी (२४ मे) सकाळपासून कमी दाबाने पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पिण्याचे आणि घरगुती वापरासाठी आवश्यक पाण्याचा साठा करून ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, अचानक बंद होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात असून, भविष्यात अशा कामांची माहिती वेळेआधी देण्याची मागणीही होत आहे.

बातम्या

Don`t copy text!