समृद्धनगर मध्ये पावसाळ्यात घरात शिरतेय पाणी
रहिवासीयांची मनपा कार्यलयात तक्रार
नाशिक मिरर वेबटीम : नाशिक महानगरपालिकेच्या सातपूर विभागीय कार्यालयाच्या वतीने अनेक ठिकाणी असलेली अनधिकृत बांधकामे,रस्तावर अतिक्रमण करणारे विक्रते ,यांचे अतिक्रमण अतिक्रमण निर्मूलन विभाग काढत असताना दुसरीकडे काही भागात अतिक्रमण सुरूच असल्याचे पहायला मिळत आहे. त्र्यंबकरोडवरून अशोकनगरकडे विधाते मळ्या समोर, समृद्धनगर च्या वळणावरीवर नैसर्गिक नाल्यावरच एका बांधकाम व्यावसायिकाने कमी व्यासाचे सिमेंट पाईप टाकून नाला बुजवून चक्क ६ गाळे उभारले आहेत. तसेच १०० मीटर अंतरावरच खाजगी जागेत जाण्यासाठी नाला बुजवून रस्ता तयार केला आहे.यामुळे पावसाळ्यात वाहत येणाऱ्या पाण्याचा लोंढा थेट समृद्धनगर मधील रहिवासी यांच्या घरात घुसत आहे.पाणी वाहून जाणार नाला च गायब झाल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे.याबाबत लेखी तक्रार परिसरातील रहिवासी श्रीराम मंडळ यांनी सातपूर विभागीय कार्यालय व राजीव गांधी भवन येथील नाशिक मनपा मध्ये केली आहे.व सदर अतिक्रमण काढून नैसर्गिक नाला पुन्हा पहिल्या सारखा मोकळा करावा अशी मागणी समृद्ध नगर मधील रहिवासी यांनी केली आहे.
२.नैसर्गिक नाल्यावर रस्ता तयार करून नाला बुजवण्यात आला आहे.
तक्रारी बाबत महापालिकेच्या बांधकाम व नगररचना विभागाशी संपर्क केला असता पाहणी करून माहिती घेतो, असेच उत्तर देण्यात आले. परंतु, महापालिकेच्या नाकावर टिच्चून नैसर्गिक नाला बुजविला जात असताना संबंधित महापालिकेची यंत्रणा काय करत होती, असा सवाल सातपूरकरांनी उपस्थित केला आहे.नाशिककरांना स्मार्ट सिटीचे स्वप्न एकिकडे दाखवले जात आहे. तर दुसरीकडे सरकारी जमिनी व नैसर्गिक नाले यावर वाढत चाललेल्या अतिक्रमणांची मोठी समस्या शहराला भेडसावत आहे.नैसर्गिक नाले शहरातुन नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.यामुळे भविष्यात मोठ्या संकटाना थोडं नाशिक शहरास द्यावे लागू शकते. त्यातच अशोकनगरकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यालगतच एका व्यावसायिकाने नाल्यावर अतिक्रमण करीत गाळ्यांची उभारणी केली आहे. पावसाळ्यात दुधडी भरून वाहणाऱ्या नाल्याला सिमेंटचा केवळ एकच छोटा पाइप टाकत व्यावसायिकाने नैसर्गिक नालाच बुजविला आहे.
सातपूर : ३.नैसर्गिक नाल्यावर गाळे बांधून अतिक्रमण केले आहे.
पावसाळ्यात जोरदार पाऊस झाल्यावर राधाकृष्णनगर, नागरे चौक, विश्वासनगर, वास्तूनगर या भागातील पावसाचे पाणी याच नाल्यातून वाहत नासर्डी नदीत मिसळते. परंतु, आता नालाच बुजविण्यात आल्याने जोरदार पाऊस झाल्यावर पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी अडचण आल्यामुळे रहिवाशांच्या घरातच पाणी जाण्याचा प्रकार घडत आहे. यामुळे नाल्यावर गाळे उभारणाऱ्या व्यावसायिकावर तत्काळ महापालिकेने कारवाई करावी, अशी मागणी समृद्ध नगर मधील रहिवासी व सातपूरकरांनी केली आहे.पावसाळ्यात समृद्ध नगर मध्ये अशा प्रकारे नागरिक त्रस्त आहेत.नाशिक महापालिकेने दखल घ्यावी अशी मागणी नागरिक करीत आहेत.
नैसर्गिक नाला बुजवण्याबाबत महानगरपालिकेची कुठल्याही परवानगी न घेता नैसर्गिक नाला बंद केला आहे.चुकीच्या पद्धतीने कमी व्यासाचे पाईप टाकून अनाधिकृत रित्या रस्ता तयार केला जात आहे.गोळे उभारले आहे. सदर ठिकाणी समृद्ध नगर येथील रहिवाशांच्या खाजगी कॉलनी रस्ता आहे. इथे कोणाचाही व्यक्तीचा संबंध नसताना नैसर्गिक नाल्या वरच अनधिकृत रस्ता तयार केला आहे. सदर ठिकाणी पावसाळी नाला बंद केल्यामुळे पावसाळ्यात जास्त आलेले पाणी सरळ समृद्ध नगरात घुसत आहे. सदर ठिकाणचे नैसर्गिक नाल्यावर पाईप टाकून केलेले अनधिकृत अतिक्रमण नाशिक मनपा ने त्वरित काढून टाकावे, अन्यथा समृद्ध नगर मधील रहिवाशी महानगरपालिकेसमोर तीव्र आंदोलन करतील. -श्रीराम मंडळ, स्थानिक रहिवासी

