नॉयलॉन मांज्या विक्री करण्यावर कडक कारवाई – राकेश हांडे,वरीष्ठ पोलीस निरीक्षक सातपूर
नाशिक मिरर वेबटीम : सातपूर मधील आनंदछाया बसस्टॉप येथिल मल्हार फ्रुट मध्ये अनाधिकृतपणे बंदी असून देखील पतंगीचा नॉयलॉन मांज्या विक्री करत असताना दिसून आले. मांज्या विक्री करणारे विशाल जगन्नाथ चौधरी यांच्यावर भा.द.वि. क १८८ नुसार सातपूर पोलीसानी गुन्हा दाखल केला आहे.परिसरात पेट्रोलिग करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना सदर बाब निर्देशनास आली. काही दिवसापूर्वी नाशिक शहरात नॉयलॉन माज्या महिलेच्या गळ्यात अडकून गळा कापला होतो.यामध्ये सदर महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे.पोलीस आयुक्त दिपक पांडे यांच्या आदेशानुसार सातपूर पोलिस ठाणे चे वरीष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे यांनी नॉयलॉन मांज्या विक्री करणाऱ्या वर कडक कारवाई करत गुन्हा दाखल केला असून, सातपूर व शहर परिसरात नॉयलॉन व तत्सम घातक मांज्या विक्री केल्यास कडक कारवाई करणार असल्याचे यावेळी सांगितले.
