निविदा मागविण्यामागील गौडबंगाल काय ? नगरसेविका सौ.माधुरी गणेश बोलकर यांनी मागविला खुलासा

नाशिक मिरर : सागर आनप

नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील सातपूर विभागामध्ये सन २०१७ मध्ये राज्याचे तत्कालीन पर्यटन विकास मंत्री जयकुमार रावल यांच्या विशेष निधीमधून प्रभाग क्रमांक १० च्या नगरसेविका सौ.माधुरी गणेश बोलकर यांनी विशेष प्रयत्न करून दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होतो.सदर निधी मधून लोहाटी नगर व नाशिक-त्र्यंबक रोड वरील खोडे पार्क समोरील सर्व्हे न.५२३ वर दीड कोटी रुपयांचा निधी मधून उद्यानाचे सर्व काम पूर्ण होऊन उद्यान नागरिकांसाठी खुले करण्यात आले आहे.तरी देखील नाशिक महानगरपालिकेच्या उद्यान विभागाच्या उपआयुक्तकडून दि.८ डिसेंबर २०२१ रोजी तब्बल ६२ लाख ३४ हजार रुपयांची निविदा ठेकेदाराकडून मागवण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे सर्व्हे न.५२३ छत्रपती संभाजी महाराज उद्यानात दीपस्तंभ (घडी व दगडाचा )उभारून तयार आहे .तरी देखील सदर कामासाठी सदर निविदा मनपा उद्यान विभागाकडून काढण्यात आली आहे.

त्यामुळे नाशिक व सातपूर मधील नागरिकांसह लोकप्रतिनिधी यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. सदर काम जिल्हा नियोजन विभागास प्राप्त निधीमधून नाशिक महानगरपालिकेच्या देखरेखीखाली पूर्ण केले आहे. तरी देखील पूर्ण झालेल्या कामाची निविदा मागवल्याने प्रभाग क्र.१० नगरसेविका तथा स्थायी समिती सदस्या सौ माधुरी गणेश बोलकर यांनी सदर निविदा बाबत सविस्तर खुलासाची मागणी नाशिक महानगरपालिकेच्या उद्यान विभागाच्या उपायुक्त कडे केली आहे.सातपूर मध्ये राज्य शासनाच्या प्रादेशिक पर्यटन विकास योजने अंतर्गत तत्कालीन पर्यटन मंत्री महाराष्ट्र शासन यांच्या विशेष निधी मधून सातपूर मध्ये प्रभाग क्रमांक १० मध्ये लाहोटी नगर व खोडे पार्क समोर त्र्यंबकरोड लगत पर्यटक व स्थानिक नागरिकासाठी उद्यानासाठी एकूण १ कोटी ४८ लाख रुपयेचा निधी मिळाला होतो.

 

सदर निधी मधून मनपाच्या भूखंडावर लाहोटी नगर येथील उद्यानाचे काम पूर्ण होऊन नागरिक व पर्यटक यांच्या साठी खुले करण्यात आले आहे. लाहोटी नगर मधील उद्यानास वीरशिरोमणी महाराणा प्रताप उद्यान तर खोडे पार्क समोरील उद्यानास छत्रपती संभाजी महाराज उद्यान नामकरणचा ठराव देखील करण्यात आला आहे.

 

मक्तेदारांस दिलेली वर्क ऑर्डर, वरील कामाचे अदा केलेल्या सर्व देयकांच्या ( बिल फॉर्मच्या) सत्यप्रती, कामाची देयके,
काम पूर्णत्वाचा दाखला, इ. माहिती मागवली आहे.जिल्हा नियोजन विभागास पर्यटन विभागाकडून प्राप्त निधी मधून सदर काम पूर्ण करण्यात आले आहे.सदर कामे पूर्ण होऊन निधी देखील शिल्लक आहे.तरी देखील सदर पूर्ण कामाची फेर निविदा मागवली आहे.त्यामुळे याबाबत सविस्तर खुलासा मागितला आहे.
– माधुरी बोलकर, नगरसेविका प्रभाग क्र.१०

बातम्या

Don`t copy text!