प्रभाग क्र.९,१० आणि ११ मधील बूथ प्रमुखांना सतर्क राहण्याचे आवाहन
नाशिक मिरर : आगामी महापालिका निवडणुकीच्यादृष्टीने शिवसेनेची बुथयंत्रणा अत्यंत सक्षम झाली असून , आमचे बूथप्रमुख कोणतेही आव्हान पेलण्यास सज्ज आहेत. त्यामुळे यावेळी सत्तापरिवर्तन अटळ असून महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकणारच,असा विश्वास जिल्हा संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांनी व्यक्त केला.
प्रभाग क्र.९,१०आणि ११ मधील बूथ प्रमुखांना ते मार्गदर्शन करत होते. यावेळी जिल्हाप्रमुख विजय करंजकर माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड,मनपा.गटनेते विलास शिंदे,यांनीही उपस्थितींना मार्गदर्शन केले.
याप्रसंगी उपमहानगरप्रमुख देवा जाधव, भा.वि.से.जिल्हा संघटक वैभव ठाकरे,महानगर संघटक योगेश बेलदार,नगरसेवक संतोष गायकवाड,नगरसेविका सीमा निगळ, हेमलता कांडेकर,गोकुळ निगळ,योगेश गांगुर्डे,करण गायकर,प्रमोद जाधव,यशवंत पवार,साहेबराव जाधव,अलका गायकवाड,सविता गायकर, मिना देवकर, सुरेखा लोळगे,हेमलता काडेकर,तुषार पाटील,बाळा झारे,राजेंद्र वाकसरे,सोनु काळे,अतुल पवार,अविनाश गायकर,विनोद जाधव,संतोष पवार,शांताराम कुटे,गोकुळ नागरे,समाधान देवरे,किशोर निकम, रंजीत हिंगमिरे,मयुर जुन्नरे सुनिल मौले,अविनाश मौले, मनोज चव्हाण,लाला सोनवणे आदी पदाधिकारीसह शिवसैनिक उपस्थित होते.
