नाशिक मिरर : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे नाशिक जिल्हा प्रमुख प्रकाश लोंढे यांनी आज रिपाई चे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची बांद्र्यातील संविधान या निवासस्थानी भेट घेतली .

लोंढे हे नाशिक जिल्ह्यात ना.आठवले यांचे अत्यंत निष्ठावंत शिलेदार म्हणून ओळखले जातात. ही एक भेट नाशिक जिल्ह्यात होणाऱ्या नाशिक महानगरपालिका, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत निवडणुका, व नाशिक जिल्ह्यातील पक्षवाढीबाबत चर्चा करण्यासाठी भेट घेण्यात आली असल्याचे समजते आहे. मागच्या २०१७ च्या मनपा निवडणूकीत भाजपा सोबत युती होणार म्हणून शेवट पर्यत वेट अँण्ड वाँच वर आसलेला रिपाई पक्षा सोबत वेळेवर युती न करता भाजपाने रिपाईची युती तोडली होती. मात्र या वेळी असे प्रसंग घडु नये या साठी प्रकाश लोंढे व ना.आठवले यांच्या मध्ये चर्चा झाली .ना.आठवलें सोबतची ही बैठक अनौपचारिक असली तरी काही महत्वाच्या विषयांवर चर्चा झाल्याची समजते आहे. मात्र जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे यांचे आचानकपणे ना. आठवले यांच्या भेटीच्या बातमीनंतर राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

यावेळी मातंग आघाडीचे जिल्हाध्यक्ष परशराम साठे, संतोष कटारे, आकाश भालेराव,दिनेश जाधव, समाधान जगताप, संतोष गायकवाड, शिवराज मोरे, सुरेश शेंडगे,दुशान्त पगारे बाळासाहेब सोळसे,आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्या

Don`t copy text!