नाशिक मिरर : सातपूर परिसरात बंगल्याचे दार उघडे राहिल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी रोकडसह साडे सात लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याची घटना काल घडली.
सातपूर त्र्यंबक रस्त्यावरील सूर्यदर्शन कॉलनी येथील मधुकर रामकृष्ण सांगळे यांच्या गोदावरी बंगला येथे सर्व सदस्य घरात असतांना चोरटय़ांनी दोन्ही बेडरूममधील लाकडी आणि लोखंडी कपाटात ठेवलेले सुमारे 48 हजार रुपयांची रोकड आणि सोन्याचांदीचे दागिने असा सुमारे सात लाख 60 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला.
याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात असून पोलीस निरीक्षक सतिश घोटेकर यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी पाहणी केली. या चोरीच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली. या पोलिसांनी या घटनेचा लवकरात लवकर तपास करावा व या भागात गस्त घालण्याची मागणी आता नागरिकांकडून केली जात आहे.
