३ लाख रुपये द्या, तरच बांधकाम सुरू करा; जागा मालकाची न्यायाची मागणी
जीवेठार मारण्याची व बांधकामावर जेसीबी चालवण्याची धमकी
नाशिक मिरर वेबटीम : नाशिक महानगरपालिका हद्दी मधील ध्रुवनगर मधील मौजे गंगापूर शिवारातील शेतजमीन गट नं ५८/१+२/२ मधील प्लॉट नं.७४ एकूण क्षेत्रफळ २८५.९५ चौ.मी चा प्लॉट जमिनीचे मालक अनिल पोपटराव बोरस्ते यांच्याकडून २५ लाख ५० हजार रुपयांना दि. १ नोव्हेंबर २०१८ रोजी सहायक दुय्यम निबंधक वर्ग २ कार्यलयात नोंदणी करून सुदर्शन मधुकर ब्राम्हणकर सद्या रा. हरी ओम अपार्टमेंट शिवाजीनगर येथे राहणाऱ्या नी खरेदी केला आहे.परंतु तरी देखील अरुण धोंडू पाटील हे (व्यवसाय : बांधकाम व प्लॉट खरेदी-विक्री करणे) आमची ही वडिलोपार्जित जमीन असून प्लॉट वर हक्क सांगून सुरू असलेले बांधकाम अनधिकृतपणे बंद अरुण पाटील व धनंजय दांडेकर यांनी बंद पाडले आहे.काम सुरू करण्यासाठी सुदर्शन ब्राम्हणकर यांच्याकडून तीन लाख रुपये खंडणी मागितली आहे. तीन लाख रुपये देत असेल तरच बांधकाम करून देऊ अन्यथा मारहाण किंवा जे काही बांधकाम केले आहे त्यावर जेसीबी चालवून सपाटीकरण करू अशी धमकी दिल्यामुळे ब्राम्हणकर यांनी गंगापूर पोलीस स्टेशन मध्ये धाव घेऊन अरुण पाटील यांच्या वर खंडणी चा गुन्हा दाखल करावा याबाबब तक्रार अर्ज देण्यात आला आहे.तसेच जिल्हाधिकारी व नाशिक महानगरपालिका मध्ये देखील सदर प्रकार बाबत तक्रार अर्ज केला असून,
प्रभाग क्रमांक ८ चे नगरसेवक दिनकर पाटील यांच्याकडे निवेदन देऊन न्याय मिळवून द्यावा अन्यथा उपोषण करण्यात येईल असे देखील सांगितले आहे. तसेच ध्रुवनगर मधील मौजे गंगापूर शिवारातील शेतजमीन गट नं ५८/१+२/२ मधील एकूण २६ एकर मधील तब्बल ६३ प्लॉट वर आपला वडिलोपार्जित हक्क सांगून प्लॉट मालकांना वेठीस धरून लाखो रुपये पाटील मागत आहेत.यातील अनेक प्लॉट धारक हे बांधकाम व्यावसायिक असून अनेकांनी दबावाला बळी पडून पैसे दिले आहेत.परंतु इतर अनेक प्लॉट धारकांनी पैसे देण्यास विरोध केला आहे.जागा मालक सुदर्शन ब्राह्मणकर, मधुकर ब्राह्मणकर ,तुषार ब्राह्मणकर वैभव ब्राम्हणकर यांनी गंगापूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली आहे.
प्लॉट खरेदीखत करून घेतलेला आहे.अरुण धोंडू पाटील यांचा प्लॉटची काही संबंध नाही.तरी देखील धमकी खंडणी मागत आहे.असे अनेक प्लॉट धारक आहेत.पण पुढे येत नाही माझ्यावर झालेला अन्याय सहन करू शकत नाही मी तीन लाख रुपये देऊ शकत नाही. त्वरित कडून अरुण पाटील व धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल करावा. – सुदर्शन ब्राम्हणकर , जागा मालक
अरुण धोंडू पाटील हा माझ्या प्रभागातील ध्रुव नगर मधील गंगापूर शिवारामधील शेकडो प्लॉट धारकांकडून स्वतः चा वारसाहक्क सांगून ३ ते ५ लाख रुपये बेकायदेशीर पणे खंडणी मागत आहे.सदर व्यक्ती वर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. जर कारवाई झाली नाही तर गंगापूर पोलीस स्टेशन समोर आंदोलन करून उपोषण करण्यात येईल .होणाऱ्या परिणामास संबंधित यंत्रणा जबाबदार असेल. – दिनकर धर्माजी पाटील, नगरसेवक प्र.क्र.८ तथा मा. सभागृह नेते नाशिक मनपा
