नाशिक मिरर वेबटीम : महाराष्ट्रात सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या छावा क्रांतिवीर सेना या संघटनेचा ७ वा वर्धापन दिन व शेतकरी,कामगार,विद्यार्थी यांच्या प्रश्नांवर झटणारे महाराष्ट्रातील युवा नेतृत्व संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री.करण गायकरयां चा अभिष्टचिंतन सोहळा अनेक प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.कोरोना महामारीच्या काळात अनेक समस्या आवासून उभ्या होत्या,सर्व सामान्य जनतेचे अतोनात हाल होत होते अशा संकटाच्या काळात अनेक मदतीचे हात पुढे आले आणि याच अभिप्रेत योद्धयांचा सन्मान हे या कार्यक्रमातील वेगळेपण होते.या वेळी व्यासपीठावर हभप जगद्गुरु रामकृष्ण महाराज लहवीतकर जनेश्वर महाराज,शांतिगिरी बाबांचे शिष्य विष्णू महाराज,कामगार नेते अभिजित राणे,धर्मवीर सुनील भाऊ बागुल,श्‍यामनाथ महाराज माजी आमदार अपूर्व हिरे,शिवसेनेचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर,माजी आमदार शिवाजी सहाणे,महापालिकेतील विरोधीपक्ष नेते अजय बोरस्ते,शिवसेनेचे गटनेते विलास शिंदे,सभागृह नेते जगदीश पाटील,स्थायी समिती सभापती गणेश गीते,भाजपा शहराध्यक्ष गिरीश पालवे,गटनेते सतीश बापू सोनवणे,नगरसेवक उद्धव निमसे, विक्रम नागरे,नगरसेविका हर्षदा गायकर,किरण गामणे,हेमलता कांडेकर,ह भ प कांचनताई जगताप,नगरसेवक शिवाजी गांगुर्डे,संतोष गायकवाड,योगेश शेवरे,गोकुळ निगळ,नंदुशेठ जाधव,बाळासाहेब लांबे यांसह अनेक नगरसेवक,सामाजिक क्षेत्रातील प्रमुख मान्यवर,विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व छावा क्रांतिवीर सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते,हितचिंतक,नातेवाईक आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.यानंतर मान्यवरांचे स्वागत करून कोरोना काळात मदत केलेल्या सर्व बांधव व भगिनींचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल,पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी मान्यवरांनी करण गायकर यांच्या कार्याची पावती देत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी बोलतांना कामगार नेते अभिजित राणे म्हणाले की करण यांच्या रूपाने महाराष्ट्राला एक आक्रमक नेतृत्व लाभलं असून त्यांच्या कार्याचा बोलबाला हा दिल्ली पर्यंत आहे.तसेच शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर म्हणाले की हे असे एक व्यक्तिमत्व ज्यांच्या कार्याची छाप हे इथे जमलेल्या जनसमुदायाच्या संख्येतुन दिसत आहे.त्यांच्या पत्नी यांना यावेळी नगरसेवक बनविण्यासाठी शिवसेनेची सर्व ताकद एकत्रित करून प्रभाग ९ मध्ये भगवा फडकविणार असल्याची त्यांनी ग्वाही दिली.तर अजय बोरस्ते हे करण गायकर यांना शुभेच्छा देतांना म्हणाले की अशा अतिशय कमी कालावधीत व कमी वयात तयार झालेल्या या अष्टपैलू नेतृत्वाची दखल सगळ्यांनी घेऊन सर्व पक्षीय नेत्यांनी त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी प्रयत्न करावे करण गायकर यांसारख्या नेतृत्वाला येणाऱ्या काळामध्ये एक चांगली जवाबदारी देण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी एकजूट दाखवून त्यांच्यात असलेल्या कर्तृत्व दाखवण्याची संधी देण्यासाठी पुढे यावे असे सांगितले.सुनील बागुल यांनी देखील शुभेच्छा देतांना गल्ली ते दिल्ली च्या नेत्यांसोबत गायकर यांचे असलेले सर्व पक्षीय हितसंबंध व त्या माध्यमातून होणारे समाज उपयोगी कार्य याची प्रशंसा केली तर उद्धव निमसे यांनी गायकर यांच्या मराठा समाजाच्या प्रश्नावरती करत असलेल्या आंदोलनाची माहिती देत त्यांच्या आक्रमक चेहऱ्याची प्रशंसा केली. माजी आमदार अपूर्व हिरे यांनी सांगितले की नाशिक मधील मराठा क्रांती मोर्चा मध्ये करण गायकर यांचे नेतृत्व प्रभावीपणे दिसून आले नाशिक मधील शिवजन्मोत्सव सोहळा ही संकल्पना करण गायकर यांच्या माध्यमातून पुढे आली आणि नाशिकमधील गोल्ड क्लब वर सर्वात मोठा शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न झाला अतिशय धडाडीनं काम करणार आहे नेतृत्व नाशिक जिल्ह्यामध्ये तयार होत आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे गटनेते विलास शिंदे यांनी सांगितले की करण गायकर यांसारखा मनमिळावू मित्र सर्वसामान्यांसाठी काम करण्याची तळमळ असलेला नेता सातपूर विभागांमध्ये असल्याचा आम्हाला अभिमान वाटतो भारतीय जनता पार्टीचे गिरीश पालवे यांनी शुभेच्छा देताना सांगितले की अत्यंत कमी वयामध्ये महाराष्ट्र नावलौकिक कमावलेलं हे नेतृत्व येणाऱ्या काळामध्ये नाशिकचा अभिमान निश्चितपणे वाढवणार तसेच सर्व राजकीय पक्षांची मैत्रीचे संबंध जपणारा हे नेतृत्व आहे हे फार कमी लोकांना जमतं करण गायकर यांनी मात्र ते करून दाखवलं तर सर्व महंतांनी त्यांना आशीर्वाद देत सांप्रदायिक क्षेत्राशी निगडित असलेल्या या व्यक्तिमत्वाला शुभेच्छा दिल्या. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रमोद जाधव, शिवा तेलंग, महेश आहेर, सम्राट सिंग, नवनाथ शिंदे, सचिन निकम, विजय खर्जुल, ज्ञानेश्वर थोरात, संतोष माळोदे, गिरीश आहेर ,करण शिंदे, अविनाश गायकर, उत्तम कापसे, प्रीतेश पाटील, किरण बोरसे, वैभव दळवी, आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्राध्यापक उमेश शिंदे यांनी केले.

बातम्या

Don`t copy text!