ग्रामपंचायत जागांसाठी नियमबाह्य पद्धतीने उमेदवारांचा लिलाव करण्याचा प्रयत्न करणारे नेतेमंडळी आणि संबंधित उमेदवारां विरुद्ध एफ. आय. आर. दाखल करण्यात आले आहे

सध्या सगळीकडे ग्रामपंचायत निवडणुकीची धूम सुरू आहे. बऱ्याच ठिकाणी उमेदवार बिनविरोध निवडून आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र यासाठी उमेदवारांकडून मोठी रक्कम उकळण्याचे काम सुरू आहे. जो उमेदवार जादा रक्कम देईल, त्या उमेदवाराची बिनविरोध निवड करण्याचे काम राज्यातील काही गावांमध्ये सुरू आहे. एक प्रकारे उमेदवारांचा लिलाव करण्याची प्रक्रिया काही गावात सुरू आहे. या प्रकरणाची राज्य निवडणूक आयोगाने गंभीरपणे दखल घेतली आहे. असे प्रकार करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी, अशी सूचना आयोगाद्वारे राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली आहे. बऱ्याच ग्रामपंचायत सदस्यांना राजकीय पक्षांकडून आर्थिक मदत करण्यात येत आहे. आपल्या पक्षातील आणि पक्षाने पाठिंबा दिलेले उमेदवार मोठ्या संख्येने निवडून यावे, यासाठी राजकीय पक्षांच्या वतीने ग्रामपंचायत निवडणुकीत साम, दाम, दंड आणि भेद या सर्वांचा वापर आतापासूनच गावागावात सुरू झाला आहे. यामुळे यंदाची ग्रामपंचायत निवडणूक वेगळ्या अर्थाने गाजणार आहे.

संबंधित उमेदवारांकडून गावासाठी, गाव सुधारण्यासाठी, गावाच्या तलावाच्या विकासासाठी किंवा गावातील मंदिरांचा जीर्णोद्धार करण्याच्या नावाखाली लाखो रुपयांची बोली लावली जात आहे. जो उमेदवार जादा रक्कम या कामासाठी देईल, त्या उमेदवारांची बिनविरोध निवड करण्याचे काम कांही गावामध्ये सुरू आहे. या प्रकरणाची दखल राज्य निवडणूक आयोगाने घेतली आहे आणि असे प्रकार करणाऱ्यांविरुद्ध व संबंधितांविरुद्ध कारवाई करण्याचा सूचना‌ जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे.

 

बातम्या

Don`t copy text!