नाशिक मध्ये महिलाचे ११ तोळे सोन्याचे दागिने ओरबाडले

नाशिक मिरर वेबटीम :रस्त्यावरून प्रवास करताय, पायी चालताय ,लग्न सोहळ्यात जाण्यासाठी महागडे सोन्याच्या दागिने परिधान गेलेल्या महिला साठी सावधानतेचा इशारा देण्यात येत आहे.कारण नाशिक मध्ये महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या दागिन्यांवर चोरट्या ची नजर असून महिन्यात अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.त्यामुळे बाहेर पडताना सोन्याचे दागिने न घालणे च समजदारी चे असून दागिने परिधान केले च तर सावधान असणे आवश्यक आहे.नाशिक मध्ये एकाच दिवशी दोन घटना मध्ये तब्बल 11 तोळे सोने ४ लाख रुपये किंमतीचे दागिने हातोहात लंपास केले आहे. आडगाव शिवारातील एका लॉन्समध्ये नातेवाईकाच्या विवाह सोहळ्यासाठी जाणाऱ्या गंगापूर रोडवरील महिलेच्या गळ्यातील अडीच लाख रुपये किंमतीची सुमारे ७ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने दुचाकीवर आलेल्या भामट्याने ओरबाडून नेल्याची घटना घडली आहे. तर दुसरी घटना नाशिक – इंदिरानगर बोगद्याजवळ महिलेच्या गळ्यातील ४ तोळे वजनाचा सोन्याचा नेकलेस दुचाकीस्वार चोरट्याने हिसकावून पळ काढल्याची घटना रविवारी (दि.१०) सायंकाळी घडली. याप्रकरणी ज्योती शिवाजी बडे (रा. कामटवाडा) यांनी याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात जबरी चोरीची फिर्याद दाखल केली आहे. ज्योती बडे या त्यांच्या पतीसोबत जॉगिंग ट्रॅकजवळ उभे असताना पाठीमागून आलेल्या चोरट्याने ८० हजार रुपयांचा नेकलेस ओरबाडून पळ काढला. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस तपास करीत आहेत याबाबत आडगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध जबरी लूट केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या जबरी लूटप्रकरणी गंगापूररोड येथे राहणाऱ्या वैभवी विश्वनाथ शेळके यांनी आडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. वैभवी शेळके हया औरंगाबाद रोडवरील एका लॉन्सवर पती तसेच मुलांसमवेत विवाह सोहळ्यासाठी जात असताना रविवारी (दि.१०) सायंकाळी साडे सातच्या सुमारास काळ्या रंगाचा शर्ट परिधान करून काळ्या रंगाच्या पल्सरवर एक भामटा आला. शेळके यांच्याजवळ येऊन त्याने त्यांच्या गळ्यातील पाच तोळे वजनाचे मनी मंगळसूत्र, एक तोळे वजनाची चैन व एक तोळ्याचे सोन्याचे गंठन मनी मंगळसूत्र असा ऐवज ओरबाडून पळ काढला. आडगांव पोलिसांना आव्हान गेल्या काही दिवसांपासून आडगांव पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोनसाखळी चोरीच्या घटना घडत असून, पोलिसांचा धाकच नसल्याने वारंवार अशा घटना घडत आहेत. चोरट्याने काळ्या रंगाची दुचाकी वापरण्याबरोबर काळ्या रंगाचा शर्ट परिधान केला असल्याचे निष्पन्न झाल्याने कालच्या घटनेतील संशयितदेखील तोच असण्याचे शक्यात आहे. आडगांव पोलिसांना सोनसाखळी चोरांच्या मुसक्या आवळण्यास अपयश येत असल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. त्यामुळे आडगांव पोलिसांसमोर सोनसाखळी चोरट्यांच्या मुसक्या आवळण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

बातम्या

Don`t copy text!