नाशिक मिरर : जुने नाशिक मधील इगतपुरीवाला चाळच्या पाठीमागील बाजुस असलेल्या संजरीनगर सोसायटीच्या फ्लॅट नं ७ मध्ये मध्यरात्री घरगुती गॅस सिलेंडरचा अचानकपणे स्फोट झाल्याने घरातील सात जण गंभीररित्या आगीत होरपळले आहेत. आगीत होरपळलेल्या सात ही जणांना जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे. चार जण ९० टक्के पेक्षा अधिक भाजलेले असुन त्यांची प्रकृती चिंताजनक बनलेली आहे. मुंबई नाका पोलिसांसह पोलिस उपायुक्त गुन्हे, पोलिस निरीक्षक गुन्हे शाखा, विशेष शाखा, सीआयडीचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेटी देऊन पाहणी केली आहे.सिलेंटर लिंकेज असल्या मुळे सदर स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे.
