दिपावली साधेपणाने साजरी करून दिव्यांग गणेश याला व्हीलचेअर भेट
नाशिक मिरर वेबटीम :   सातपूर मधील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रभाग क्रमांक ११ चे नगरसेवक तथा मा. सातपूर प्रभाग सभापती योगेश शेवरे यांनी कोरोना महामारी च्या पार्श्वभूमीवर दिवाळी साधपणाने साजरी करून दिव्यांगासाठी मदतीचा हात पुढे करीत, जन्मतः दोन्ही पायांनी अपंग  व विकलांग असलेल्या सातपूर कॉलनी मधील गणेश रामदास आहेर यांना तीनचाकी सायकल भेट देऊन दिपावली ची आगळीवेगळी भेट दिली.व गणेशला सायकल वरून परिसरात फिरवले असता चेहऱ्यावर हसू फुलले दिसून आले. मानवतेचे दर्शन घडविणाऱ्या या उपक्रमाने परिसरातील उपस्थितांचे मन देखील भारावलेले दिसून आले.
          नाशिक मधील सातपूर कॉलनी  येथील रामदास आहेर यांची कौटुंबिक परिस्थिती अंत्यत हलाखीची आहे. त्यामुळे कोरोना व्हायरस च्या परिणाम मुळे यावर्षी कामगार ,सर्वसामान्य नागरिक , मोलमजुर होरपळून गेले आहेत.काहींना यंदा दिवाळी कशी साजरी करायची हा देखील प्रश्न पडला आहे.कामगारांचा अजून देखील पगार कपात सुरू आहे.तरछोट्या कंपन्यानी बोनस च दिला नाही. या पार्श्‍वभूमीवर नगरसेवक योगेश शेवरे यांनी दिवाळी अगदी साधेपणाने साजरी करून गणेश याला सायकल भेट देऊन जगण्याची एक नवी उमेद दिली. अचानकपणे सायकल भेट मिळाली म्हणून ती  स्विकारताना रामदास आहेर यांचे डोळे पाणावले होते. दिव्यांग  गणेश रामदास आहेर यांना व्हील चेअर भेट करतांना दिपक हिंगमिरे, राहुल सहाणे, हर्षल आहेर, शैलेश बस्ते, शैबाज काजी , प्रभात पिल्ले आदी मित्रपरिवार उपस्थित होते.

बातम्या

Don`t copy text!