दिवाळीचा तिसरा दिवस : लक्ष्मीपूजन महत्व विशेष

नाशिक मिरर वेबटीम : आज दिवाळीचा तिसरा दिवस दिवाळीचा पाच दिवसांपैकी सर्वात महत्तवाचा दिवस अर्थात लक्ष्मी पुजन. या दिवशी आबालवृद्ध धनाची देवी अर्थात लक्ष्मीची पुजा करतात . या दिवशी मोठ्या प्रमाणात फटाके उडवून आनंद साजरा करण्याची प्रथा आहे.सामान्यतः अमावास्या हा अशुभ दिवस म्हणून सांगितला आहे; पण त्याला अपवाद या अमावास्येचा आहे. हा दिवस शुभ मानला आहे; पण तो सर्व कामांना नाही; म्हणून या दिवसाला शुभ म्हणण्यापेक्षा आनंदी दिवस म्हणणे योग्य
अमावस्येच्या रात्री दिवाळी साजरी करतात आणि त्या दिवशी देवी लक्ष्मी ची पूजा करतात. आम्हाला समृध्द करणारी दिव्यता, ही देवी लक्ष्मीचेच रूप आहे. भारतात ईश्वराला केवळ पुरुष रूपातच नव्हे तर स्त्री रुपात सुध्दा पुजले जाते. घर असो किंवा कार्यालय.दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनाला प्रत्येक ठिकाणी मोठं महत्त्व आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी विशिष्ट मुहूर्तावर लक्ष्मीची पूजा केली जाते. दिवाळीचा सण मोठा, नाही आनंदाला तोटा असे म्हणत हा मांगल्यपूर्ण सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दिव्यांची आणि त्याबरोबरीने आनंदाची उधळण करणारा हा सण राज्यासह देशविदेशात साजरा केला जातो. दिवाळीमध्ये लक्ष्मीची पूजा करून आपल्यावर तिचा कृपा-आशीर्वाद राहावा, यासाठी मनोकामना केली जाते अश्विन अमावास्येच्या रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करते. आणि आपल्या निवासासाठी योग्य असे स्थान शोधू लागते. जेथे चारित्र्यवान, कर्तव्यदक्ष, संयमी, धर्मनिष्ठ, देवभक्त आणि क्षमाशील पुरुष आणि गुणवती आणि पतीव्रता स्त्रिया असतात, त्या घरी वास्तव्य करणे लक्ष्मीला आवडते, अशी आख्यायिका आहे. समृद्धी आणि ऐश्वर्य यांचे प्रतीक असलेल्या लक्ष्मीची पूजा या रात्री केली जाते.श्री लक्ष्मीपूजनाच्या वेळी अक्षतांनी बनवलेले अष्टदल कमल किंवा स्वस्तिक यांवरच श्री लक्ष्मीची स्थापना केली जाते. त्यानंतर लक्ष्म्यादी देवतांना लवंग, वेलची आणि साखर घालून तयार केलेल्या गायीच्या दुधाच्या खव्याचा नैवेद्य दाखवतात. धने, गूळ, साळीच्या लाह्या, बत्तासे इत्यादी पदार्थ लक्ष्मीला वाहून नंतर ते आप्तेष्टांना वाटतात याखेरीज चलनी नोटा, नाणी, सोन्याचे अलंकार यांचीही पूजा यावेळी केली जाते. व्यापारी वर्गात यापूजेच्या वेळी फटाके उडवून आनंद साजरा केला जातो.

अजिंक्य तरटे,
9423515400
लेखक : स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी आहेत

लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त कोणता? कसं करावं लक्ष्मीपूजन?

दिव्यांचा सण म्हणून ओळख असणाऱ्या दीपावलीचा आज पहिला दिवस. यंदा नरक चतुर्दशी आणि लक्ष्मी पूजन एकत्रितपणे साजरी केली जाणार आहे. परंतु, यंदा कोविड-19 संकटामुळे सण साजरा करण्यावर काही बंधनं आली आहेत.

लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त कोणता? कसं करावं लक्ष्मीपूजन?

हिंदू सणांमध्ये गणेशोत्सव आणि नवरात्रीनंतर सर्वात मोठा सण येते तो म्हणजे दिवाळी. दिवाळीची सुरूवात वसुबारस पासून होते. त्यानंतर धनतेरस, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, दिवाळी पाडवा, भाऊबीज असे सण दिवाळीमध्ये साजरे केले जातात. यावेळी नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन एकाच दिवशी आले आहे. तर पाडवा आणि भाऊबीज देखील एकाच दिवशी आले आहे. दिव्यांचा सण म्हणून ओळख असणाऱ्या दीपावलीचा आज पहिलाच दिवस. सर्वत्र दिव्यांची आरास, घरापुढे रांगोळी, दरवाज्याला तोरण लावून दिवाळी पहाटची सुरुवात होते.यंदा दिवाळीचा सण आणि लक्ष्मी पूजन एकत्रितपणे साजरी केली जाणार आहे. लक्ष्मी पूजनावेळी देवी लक्ष्मी, कुबेर आणि गणेशाची पूजा केली जाते. तसेच घरात सुखशांती, समृद्धी कायम रहावी यासाठी प्रार्थना ही केली जाते. या दिवशी संध्याकाळी लक्ष्मी पूजा केली जाते. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मीला फराळाचा आणि लाह्या-बत्तास्यांचा नैवेद्य दाखवला जातो.आजच्या दिवशी घराबाहेर रंगीबेरंगी रांगोळ्या काढल्या जातात. त्यावर दिव्यांची आरास केली जाते. कंदील, विद्युत रोषणाई यामुळे सारा परिसर प्रकाशमय होतो. फटाक्यांची आतिषबाजी होते. मिठाई, फराळ यांची मेजवानी असते. सगळीकडे उत्सहाचं वातावरण असतं. परंतु, यंदा कोविड-19 संकटामुळे सण साजरा करण्यावर काही बंधनं आली आहेत.

लक्ष्मीपूजनचा शुभ मुहूर्त :
दर्श अमावस्या, महालक्ष्मी कुबेरपूजन आश्विन कृष्णपक्ष, शनिवार दि. 14 नोव्हेंबर 2020 दुपारी 2.18 पर्यंत चतुर्दशीनंतर अमावस्या आहे.शुभ मुहूर्त : संध्याकाळी 5.28 ते 7.30 पर्यंत .

कसं कराल लक्ष्मीपूजन :
दिवाळीत लक्ष्मीपूजनाची तयारी करतानाप प्रथमत: घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याची पाने, झेंडुची फुले यांचा समावेश असलेले तोरण आवर्जुन लावावे. घरात सकारात्मक ऊर्जा येण्यासाठी गंगाजल, हळद, कापूर एकत्र करून घरातील प्रवेशद्वाराजवळ शिंपडावे. दिवाळीतील लक्ष्मीपूजन किंवा अन्य कोणत्याही पूजनावेळी देवघरात कुंकू किंवा शेंदूराचा वापर करून स्वस्तिक काढावे, असे सांगितले जाते. स्वस्तिक चिन्ह हे गणपती बाप्पाचे प्रतीक मानले जाते. स्वस्तिक चिन्हामुळे घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. सुख, समृद्धीत वृद्धी होते, असे सांगितले जाते.लक्ष्मीपूजन ज्याठिकाणी करावयाचे आहे तिथे पूजेच्या स्थानी नवग्रह यंत्र ठेवा. त्यावर सोन्याचं किंवा चांदीचं नाणे ठेवा. हे उपलब्ध नसल्यास आपण काही नाणी किंवा पैसे देखील ठेऊ शकता. त्यानंतर गणपती आणि लक्ष्मी मातेच्या दोन्ही मूर्तींना स्नान घालून स्वच्छ धुवून-पुसून विराजमान कराव्यात. तसेच त्या फुलांनी देखील सजवाव्यात. त्यानंतर मूर्तीच्या उजव्या बाजूला तुपाचा किंवा तेलाचा पंचमुखी दिवा लावून पूजा संपन्न करावी.

 

बातम्या

Don`t copy text!