नाशिक मिरर :  अंबड लिंक रोड येथील वाहतुकीच्या मुख्य रस्त्यावर विरुध्द दिशेने  जाणाऱ्या दुचाकीस्वाराचा आयशर ट्रकच्या मागच्या चाकाखाली पडून  जागीच मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे.
       सातपूर अंबड लिंक रोड येथील इंडियन ऑईल पेट्रोल पंपाच्या समोर पेठ रोड येथील स्पंदन मेडिकलचे मालक आणि  वैदकिय क्षेत्रात कार्यरत असलेले योगेश पवार हे आपल्या स्पेलंडरने रस्त्यांवरचा शॉर्टकट मारण्यासाठी घराकडे जात असतांना त्याची दुचाकी स्लिप झाल्याने तो रस्त्यांने जाणार्या एम एच १५ एफ व्ही ९८११या आयशर ट्रकच्या मागच्या चाकांखाली सापडून जागीच ठार झाला.
घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा करुन मयत योगेश पवार यांचा मृतदेह पुढील कारवाईसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला.
दरम्यान मयताच्या डोक्यात हेल्मेट नव्हते आणि रॉन्ग साईडने ओव्हर टेक केल्याने सदर अपघात घडला असल्याचे पोलिस प्रशासनाने सांगितले.
 रस्त्यांवर जातांना हेल्मेटचा वापर केला पाहिजे.तसेच वाहतुकीची रात्रंदिवस वर्दळीच्या आणि दुभाजकामुळे अरुंद झालेल्या  यामुख्य रस्त्याच्या साईड पट्टीचे काम ठेकेदाराने अपुरे ठेवले  असल्याने सदर अपघात झाला असल्याचा आरोप सामजिक कार्यकर्ते नितीन निगळ यांनी केला असुन मनपाने बांधकाम आधिकारी आणि   ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

बातम्या

Don`t copy text!