अशोकनगररोड वरील दुभाजकाचे काम करणाऱ्या ठेकेदार व महिंद्रा कंपनी व्यवस्थापनावर गुन्हा दाखल करा-  देवा जाधव उपमहानगरप्रमुख शिवसेना 
नाशिक मिरर :  अशोकनगररोडवरील श्रमिकनगर, शिवाजी नगर रस्त्यावर महिंद्रा कंपनीत मटेरिअल घेऊन आलेल्या ट्रक रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभे राहतात व याठिकाणी दुभाजकाचे काम चालू असून काम सुरू असल्या बाबत चे कुठल्या

ही प्रकारचे सावधान चे सुरक्षा फलक तसेच रिफ्लेक्टर,रेड सिग्नल हे सदर ठिकाणी लावले नसल्यामुळे दि.८ रोजी  सायंकाळी ८  वाजेच्या सुमारास दुचाकी स्वार दुभाजकावर आदळून अपघात झाला. यात दुचाकी स्वार गंभीर जखमी झाला. या अपघाताला  ठेकेदार व महिंद्रा कंपनी व्यवस्थापन जबाबदार आहे.

 म्हणून त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करा व अपघात ग्रस्त तरुणाला संपूर्ण वैद्यकीय खर्च ठेकेदाराने द्यावा अशी मागणी सातपूर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांच्याकडे शिवसेनेचे उपमहानगरप्रमुख देवा जाधव यांनी केली.
यावेळी विभागप्रमुख युवराज धाञक,शांताराम कुटे, गोकुळ नागरे, निवृत्ती इंगोले,प्रशांत दैतकर,अशोक पारखे, शाम फर्नांडिस,मयुर जुन्नरे, प्रसाद खैरनार शिवाजी चोथे आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.

बातम्या

Don`t copy text!