नाशिक मिरर :
सातपूर विभागीय कार्यालयात सातपूर प्रभागाची बैठक सातपूर प्रभाग सभापती योगेश शेवरे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली.यावेळी अनेक समस्यांच्या विषयांवर लोकप्रतिनिधी यांनी मनपा अधिकारी यांना चांगलेच धारेवर धरले.सभापती शेवरे यांनी अधिकार्‍यांनी लोकप्रतिनिधींची कामे करण्यात कूचराई केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिेले.

या बैठकीत नगरसेवक सलिम शेख यांनी मनपाच्या कार्यप्रणालीवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले. पाण्याच्या पाईपलाईनमध्ये दारुच्या बाटल्या, दगड कशे सापडू शकतात याबाबत तिव्र चिंता व्यक्त केली. परिसरातील डेंग्यू मलेरिया साथीच्या पार्श्वभूमीवर वाढलेल्या गवतावर तण नाशक मारण्याची मागणी सिमा निगळ, दिक्षा लोंढे यांनी केली. शहर परिसरात वाढत्या अतिक्रमणावर सर्वच नगरसेवक चिंता व्यक्त करताना दिसून आले. दिक्षा लोंढे यांनी अधिकारी फोनच उचलत नसल्याचे सांगून अधिकार्‍यांना धारेवर धरले.
हेमलता कांडेकर यांनी विद्यृत विभागाला धारेवर धरीत गूंठेवारीमध्ये विद्यृत कामांची पूर्तता करण्यासाठी व त्या कामाचा शुभारंभ करण्यासाठी आग्रह धरला. प्रभागात चार नगरसेवक असताना एकालाच डावलून शुभारंभ कसा केला जातोे? असा सवालही उपस्थित केला.

सातपूर विभागातील बांधकाम, ड्रेनेज, घनकचरा व्यवस्थापन , मनपाचे रुग्णालये, प्रसूतीगृहे, कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण, अतिक्रमण , पाणीपुरवठा, अग्निशमन, पशुसंवर्धन, उद्यान विषयक कामाची चर्चा करण्यात आली. यावेळी प्रभागामध्ये अनेक नागरी सुविधांचा अभाव असल्याचे शिवाय सातपूर मळे परिसरातील रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे. प्रभागात अस्वछता मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली आहे. होकर्स झोन मध्ये सुविधांचा अभाव तसेच अनेक समस्यांवर यावेळी लोकप्रतिनिधी यांनी अधिकारी यांना चांगलेच धारेवर धरले.

याप्रसंगी सभापती योगेश शेवरे,विभागीय अधिकारी नितिन नेर,नगरसेवक सलीम शेख, मधुकर जाधव,नगरसेविका दिक्षा लोंढे, हर्षदा गायकर, राधा बेंडकुळे, नयना गांगुर्डे, सीमा निगळ, हेमलता कांडेकर, स्वीकृत सदस्य दशरथ लोखंडे तसेच मनपा अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.या बैठकीसाठी विजय गवारे यांनी अथक परिश्रम घेतले.

बातम्या

Don`t copy text!