नाशिक मिरर वृत्तसेवा, सातपुर- कोचिंग क्लासेस टीचर्स फेडरेशन & सोशल फोरम महाराष्ट्र च्या राज्य कार्यकारिणीवर मार्गदर्शक निमंत्रित सदस्य म्हणून ज्ञानगंगा क्लासेस चे संचालक प्राध्यापक कारभारी म्हस्के सर यांची संपूर्ण राज्य कार्यकारणी तर्फे निवड करण्यात आली त्याप्रसंगी उपस्थित संघटनेचे अध्यक्ष प्राध्यापक बंडोपंत भुयार, सचिव प्राध्यापक रफिक शेख, कार्याध्यक्ष प्राध्यापक वैजनाथ कानगुले, संघटक प्राध्यापक नागेश कल्याणकर, संघटक प्राध्यापक ज्ञानेश्वर म्हस्के, सल्लागार प्राध्यापक यशवंत बोरसे, कार्याध्यक्ष प्राध्यापक फैसल पटेल त्याचबरोबर नाशिक जिल्हाध्यक्ष प्राध्यापक विजय डोशी सह संपूर्ण राज्य व जिल्हा पदाधिकारी हजर होते.

सदर राज्यस्तरीय बैठक नाशिक येथील संदीप फाऊंडेशन येथे आयोजित करण्यात आली होती या बैठकीत विद्यार्थ्यांच्या हिताचे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले त्याचबरोबर संघटनेच्या वाढीसाठी व कोरोना काळात खाजगी क्लास चालकांवर आलेल्या संकटांवर चर्चा करून संघटनेची पुढील दिशा ठरविण्यात आली या चर्चेत संपूर्ण राज्यातून जवळपास प्रत्येक जिल्ह्यातील दोन प्रतिनिधी उपस्थित होते.

बातम्या

Don`t copy text!