नाशिक मिरर :

येथील मनपा प्रभाग १० मध्ये सभापती योगेश शेवरे यांनी पाहणी दौरा करुन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. मात्र ज्या आधिकारी व कर्मचार्यानी कामात कसूर केला असेल त्यांच्यावर नाशिक महानगरपालिका अधिनियम 1949/ 56/2नुसार कार्यवाही करण्यात येईल.असा इशाराही दिला आहे.

 

सातपूर सभापती योगेश शेवरे यांनी वतीने पिंपळगाव बहुला येथे संपूर्ण सातपूर मनपा अधिकारी कर्मचारी यांच्यासह दौरा घेण्यात आला यावेळी नागरिकांनी अनेक समस्याचा पाढा सभापती समोर वाचून काढला. पिंपळगाव बहुला येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागते. घंटागाडी, स्ट्रीट लाईटचा प्रश्न, रस्त्यांचा प्रश्न,असे विविध प्रश्न नागरिकांनी मांडले.

याप्रसंगी सातपूर सभापती योगेश शेवरे, नगरसेविका इंदुबाई नागरे, माधुरी बोलकर, बांधकाम अधिकारी कोल्हे, विद्यूत विभागाचे खान, उद्यान विभागाचे जगदीश लोखंडे, आरोग्याचे माधुरी तांबे, भुयारी गटारीचे राजपूत यांच्यासह विविध विभागाचे कर्मचारी, व प्रभागातील सर्व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

दरम्यान सातपूर प्रभागात 8, 9, 10,11,26. या पाचही प्रभागात ऐकच मिनी घंटागाडी असल्याने घंटागाड्या वाढवाव्यात अशी देखील मागणी नागरिकांसह लोकप्रतिनीधीनी केली आहे.यावेळी सभापती योगेश शेवरे यांनी प्रभाग १० मधील समस्या येत्या आठ दिवसात नागरिकांचे प्रश्न मार्गी लावणार असल्याचे सांगितले.

बातम्या

Don`t copy text!