नाशिक मिरर  :

प्रबुध्दनगरातील रोहिदास चौक येथे दि.२१ऑगस्टला झालेल्या गैस गळतीच्या स्फोटात शुभम संतोष डावरे व त्याची आई दोघे मायलेक गंभीररित्या भाजले होते.

दरम्यान उपचारा दरम्यान आईचा रुग्णालयात मृत्यू झाला आहे. परंतू गंभीर भाजलेला शुभम हा वेदांत हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे.त्याचे वडील पाच वर्षापूर्वी मयत झाल्याने घरातील आर्थिक परिस्थिती हलाकीची आहे.उत्पन्नाचा अन्य कोणताही स्तोत नसल्याने शुभमला जीवनदान देण्यासाठी व उपचारासाठी शक्य होईल तेवढी आर्थिक मदत करावी असे भावनिक आवाहन मनसेचे कार्यकर्ते विजय आहिरे यांनी केले आहे.

अधिक माहिती व पे फोनसाठी राहुल विठोबा चव्हाण 7507264094 यांच्याशी संपर्क साधावा.

बातम्या

Don`t copy text!