मा.मंत्री पंकजा मुंडे व जयकुमार रावल यांची प्रमुख उपस्थिती
नाशिक मिरर :
सातपूर विभागात रो-हाऊस, डुप्लेक्स रो- बंगलो, बोलकर व्हॅली, स्वामींनी हाईट्स, बोलकर नक्षत्र, बोलकर रेसीडेन्सी यासारखे शेकडो गृह व शॉपिंग सेंटरचे प्रकल्प उत्तम रित्या वास्तुशास्त्रा नुसार साकारणारे बोलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे संचालक श्री. गणेश तुकाराम बोलकर सातपूरसह नाशिक शहरात उत्तम वास्तू विशारद म्हणून परिचित आहेत.त्याच्या बांधकाम व्यवसायाने २२ वर्ष पूर्ण करून २३ व्या वर्षात पर्दापण केले आहे.सातपूर परिसर हा औद्योगिक वसाहती चा कष्टकरी कामगार परिसर असल्याने त्यांना परवडणाऱ्या दरात घरे उपलब्ध करून देण्यास सुरुवात गणेश बोलकर यांनी केली.
त्याचा नवीन प्रकल्प ९० शॉप व ९८ टूबीएचके चा प्रकल्प गट नं. ४८९, मौले हॉलशेजारी, अशोकनगररोड वर बोलकर मॅजेस्टिक या नावाने साकारण्यात येत आहे.तर तब्बल ११६ डुप्लेक्स रो हाऊसेसचे बोलकर संकुल गट नं. ४३४/१, ४३४ (ब), सातपूर येथे साकारण्यात येत आहे. बोलकर मॅजेस्टीक व बोलकर संकुल या नव्या दोन गृहप्रकल्प व शॉपिंग कॉम्प्लेक्सचा भूमीपूजन संमारभ मंगळवार दि. २ नोव्हेंबर २०२१ रोजी धनत्रयोदशीच्या शुभमुहूर्तावर सकाळी ९.३० वा. गट.नं. 489, मौले हॉलशेजारी, अशोकनगर, सातपूर, नाशिक येथे आयोजित करण्यात आला आहे. भूमिपूजन पंकजा मुंडे मा. महिला व बालकल्याण मंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे मा.आ. जयकुमार रावल मा. पर्यटनमंत्री महाराष्ट्र राज्य कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत.
यावेळी सीमा हिरे आमदार नाशिक पश्चिम, बाळासाहेब सानप प्रदेश उपाध्यक्ष भाजपा महाराष्ट्र,देवयानी फरांदे आमदार नाशिक मध्य, राहुल ढिकले आमदार नाशिक पूर्व, सतीश कुलकर्णी महापौर नाशिक मनपा, गणेश गीते स्थायी समिती सभापती नाशिक मनपा, लक्ष्मण सावजी चिटणीस महाराष्ट्र प्रदेश, गिरीष पालवे शहराध्यक्ष भाजपा नाशिक, विजय साने
ज्येष्ठ नेते भाजपा, सौ. हिमगौरी आडके शहराध्यक्षा,महिला आघाडी भाजपा आदी ची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
नाशिक व सातपूर शहर परिसरातील नागरिकांना उपस्थित राहण्याचे निमंत्रण कार्यक्रमाचे स्वागतोत्सुक श्री. गणेश तुकाराम बोलकर संचालक श्री स्वामी समर्थ कन्स्ट्रक्शन बोलकर बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्स आणि
सौ. माधुरी गणेश बोलकर नगरसेविका प्र. क्र. १०, मा. प्रभाग सभापती, सातपूर सदस्या, मनपा स्थायी समिती.
सदस्या, महिला व बालकल्याण समिती, नाशिक चिटणीस, भाजपा महिला आघाडी, नाशिक यांनी दिले आहे.

