कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना तत्काळ अटक करा – आमदार सीमाताई हिरे.

सातपूर :

कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बद्दल जे अपशब्द वापरले त्याविरोधात नाशिक मध्ये भाजपने आंदोलनाव्दारे पटोलेंना धारेवर धरले आहे.

नाशिक शहरातील सातपूर परिसरात नाना पटोलेंच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करण्यात आले.आमदार सीमा हिरे यावेळी म्हणाल्या कि, सर्वप्रथम या वक्तव्याचा निषेद करतो. अशा पद्धतीने कोणी पंतप्रधानांबद्दल अपशब्द वापरत असतील तर त्यांना तात्काळ अटक करावी. एकीकडे नारायण राणे बोलल्यावर त्यांना अटक केली जाते तर दुसरीकडे पटोले यांना वेगळा न्याय का? असा सवाल आमदार सीमा हिरे यांनी यावेळी केला. या प्रसंगी उपस्थित शहर अध्यक्ष गिरीश पालवे, नगरसेविका इंदुमती नागरे, नगरसेविका माधुरी बोलकर, नगरसेविका वर्षा भालेराव, महेश हिरे, चारुदत्त आहेर, रामहरी संभेराव, भगवान काकड, संगिता शेळके, राजेश दराडे, बंटी नेरे, योगेश मालुंजकर, ऋषिकेशआहेर, रोहिणी नायडू, रश्मी हिरे व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

 

बातम्या

Don`t copy text!