नाशिक मिरर वेबटीम: समाज स्वास्थ्यासाठी पोलिस दल स्वस्थ असणे गरजेचे आहे. कोरोनालाटेत पोलिसदलाचा प्रमुख म्हणून माजी जबाबदारी होती, ही जबाबदारी यशस्वी झाल्याने आता पोलिस अवैध धंदे, गुन्हेगारांविरोधात बिनटाक्याच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी सज्ज झाले आहे, अशी ग्वाही पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी दिली.
बिनटाक्याच्या सर्जरीसाठी पोलिस सज्ज जिल्ह्यातील संपादक फोरममध्ये विविध संपादकांशी पांडे मंगळवारी (ता. १०) बोलत होते. पांडे म्हणाले, अवैध धंदे हा कायम पोलिसांच्या दिशेने बोट दाखविणारा विषय राहिला आहे. वास्तविक, ही सगळ्या विभागाची जबाबदारी असते. जे विभाग परवानग्या देतात, तेच त्यातील नियमभंगाबाबत जास्त अचूक कारवाई करू शकतात.त्यामुळेच अवैध धंद्याविरोधात कारवाईसाठी विविध विभागांचा एकत्रित फोरम केला आहे. त्याला सगळ्या विभागांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने दोन-दोन तास अभ्यास करायलाच हवा. हाच अवैध धंद्याविरोधात एकत्रित फोरमचा उद्देश आहे. यापुढे ज्या कारवाया होतील त्या कारवाया म्हणजे समूळ उच्चटनासाठी बिनटाक्याच्या शस्त्रक्रियाच ठरतील, असा दावा त्यांनी केला.ते म्हणाले, दर शनिवारी प्रत्येक पोलिस ठाण्याला भेट देतानाच आजपासून रोज सांयकाळी एका पोलिस चौकीला सरप्राईज भेट देण्याचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. नाशिक शहर अनेक अंगाने वैशिष्ट्यपूर्ण शहर असून, येथील व्यवस्था भक्कम करण्यासाठी प्रयत्न करत आहे. यात माध्यम आणि लोकसहभाग घेतला जाईल. प्रत्येक अर्जावर निर्णय घेण्याचे निर्देश पोलिस अधिकाऱ्यांना दिले आहेत. रस्त्यावर चालण्याचा पहिला हक्क सामान्य नागरिकांचा असून, आंदोलनाच्या नावाखाली कुणालाही रस्ते अडविता येणार नाही. त्याविषयी मी सगळ्या राजकीय मंडळींना पूर्वकल्पना दिली आहे. रस्ते अडविल्यास कुणावरही कारवाई होईल. पोस्ट कोविड सेंटरला चांगला प्रतिसाद असून, १०० टक्के रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे आता इतर आजार दूर करण्याचे प्रयत्न आहेत.
>जिल्हाधिकारी चक्क कार्यालय सोडून ‘जोडप्याला’ भेटतात तेव्हा..!…
पोलिस आयुक्त दृष्टिक्षेपात
– शहराची कायदा सुव्यवस्था अबाधित राखणे
– गुन्हेगारीला आळा घालणे
– शहर वाहतूकव्यवस्था राखणे
– पोलिसांचे मनोबल संभाळणे
– लोकांशी संवाद
