सातपूर आयटीआय परिसरातील अतिक्रमण

सातपूर : नाशिक मिरर वेबटीम
नाशिक महानगरपालिकेतर्फे सातपूर आयटीआय परिसरातील गालिचे, चादरी,कर्टन व इतर शोभिवंत वस्तूचे विक्री करणाऱ्याचे अतिक्रमण गुरुवार( दि ५)सायंकाळी काढण्यात आले. अतिशय वर्दळीच्या त्र्यंबकेश्वर रोडवर गालिचे चादर कर्टन व इतर शोभिवंत वस्तूच्या दुकानाचे अतिक्रमण वाढले होते. ग्राहकांच्या गाड्या मुळे त्र्यंबकेश्वर रोडवर वाहतूक अडथळा ठरत धोकादायक ठरत होता.या बाबतीत सातपूर अतिक्रमण तक्रार आल्याने गुरुवार सायंकाळी अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्यात आली. सर्व ठिकाणची अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात येत साहित्य जप्त करण्यात आले. सातपूर विभागीय अधिकारी नितीन नेर यांच्या मार्गदर्शनाखाली पथक प्रमुख संजय कोठुले सह सिडको सातपूर पथकातील कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

बातम्या

Don`t copy text!