सातपूर : नाशिक मिरर वेबटीम
सातपूर राष्ट्रवादी काँग्रेस चे कार्याध्यक्ष व युवा नेते कल्पेश कांडेकर यांच्यातर्फे देवळाली मतदार संघाच्या आमदार सरोजताई आहिरे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. सरोजताताई यांची महाराष्ट्र विधान मंडळाच्या महिला व बालकांचे हक्क आणि कल्याण समिती राज्यमंत्री पदाचा दर्जा मिळाला. नाशिक शहरासाठी हीं आनंदाची गोष्ट आहे. ताईंना शुभेच्छा देऊन अभिनंदन व सत्कार करण्यात आला.यावेळी कल्पेश यांचे मित्रमंडळी देखील।उपस्थित होते. आ.आहिरे यांनी मतदारसंघा सोबत आता संपूर्ण राज्याची जबाबदारी मिळाली असून, राज्यातील महिला व बालकांचे हक्क व त्याचे अधिकार व त्यांच्या साठी असणाऱ्या योजना प्रभावीपणे राबविणार असल्याचे आश्वासन उपस्थित पदाधिकारी यांना दिला.
