दिवाळीच्या पुर्वसंध्येला आहेरगाववर शोककळा 

 निफाड : नाशिक मिरर वेबटीम नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील आहेरगाव येथील सुदर्शन दत्तात्रय देशमुख (32) या जवानाचा  पठाणकोट ( पंजाब) येथे कर्तव्यावर असताना मृत्यू झाला. या घटनेमुळे आहेरगाव  परिसरात शोककळा पसरली आहे

सुदर्शन देशमुखने २००९ मध्ये कुलाबा येथुन सैन्यदलात प्रवेश मिळविला होता . त्यानंतर सैन्यदलासाठी पुणे येथे प्रशिक्षण झाले. २०१२  मध्ये लेह-लडाख येथे कर्तव्याचे पहिले  ठिकाण मिळाले. २०१५  मध्ये  अमृतसर येथे तर  २०१८ पासून पठाणकोट येथे  सुदर्शन कर्तव्यावर होता. सोमवारी (दि. 9 )  रोजी मध्यरात्रीच्या सुमारास सुदर्शन यांना वीरमरण आल्याची माहिती तेथील प्रशासनाने  कुटुंबियांना दिली कुटुंबातील एक सदस्य ,नातेवाईक असे दोन व्यक्ती तातडीने पठाणकोटकडे रवाना झाले आहे.   सुदर्शन याचे शिक्षण बारावीपर्यंत झाले आहे. पहिली ते सातवीचे शिक्षण आहेरगाव येथील प्राथमिक विद्यामंदिर येथे, आठवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण पिंपळगाव हायस्कूल, तर अकरावी ते बारावीचे शिक्षण पिंपळगावच्या क. का. वाघ महाविद्यालयात झाले आहे. सुदर्शन याचे  कुटूंबात आई, वडील, एक मोठा भाऊ आहे कुटुंबाच्या एक  एकर शेती आहे .

बातम्या

Don`t copy text!