नाशिक मिरर वृत्तसेवा :
नाशिकच्या सातपूर-अशोकनगर परिसरामध्ये कार्तिकी कन्स्ट्रक्शन द्वारे उभारल्या जाणाऱ्या ‘श्री कृष्णा हाईट्स’ या निवासी संकुलाचा भूमिपूजन समारंभ दिनांक १५ नोव्हेंबर शनिवार रोजी मोठ्या उत्साहात आणि मंगलमय वातावरणात पार पडला. सायंकाळी ५ वाजता झालेल्या या शुभ सोहळ्यासाठी नाशिकमधील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.
मान्यवरांच्या उपस्थितीत भूमिपूजन समारंभ संपन्न
या प्रकल्पाच्या भूमिपूजन समारंभासाठी मुख्य अतिथी म्हणून मा. आ. माजी आमदार डॉ. अपूर्व हिरे यांनी उपस्थित राहून प्रकल्पाला शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी मा. नगरसेवक शशिकांत जाधव, माधुरी बोलकर, गणेश बोलकर, समाधान देवरे, दिनकर कांडेकर, रामहरी संभेराव, नारायण जाधव, इंद्रभान सांगळे, भगवान काकड, विलास वाकचौरे, अरविंद सोनवणे, दत्ता राऊत, बंजरंग शिंदे आदीसह परिसरातील सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थितीत होते. उपस्थित मान्यवराचा स्वागत ह. भ. प. श्री तान्हाजी दगडू पवार, इंजिनिअर संदीप तान्हाजी पवार, इंजि.निलेश विष्णू मोहिते, दिलीप नारायण घुगे, सुनील दिलीप घुगे, आणि श्री. अरुण दिलीप घुगे आदी कार्यक्रमाचे आयोजक व सयोजक आहेत. प्रकल्पाचे आर्किटेक्ट म्हणून निलेश पिंगटे तर ॲडव्होकेट म्हणून सुनील शेलार काम बघत आहे.
कार्तिकी कन्ट्रक्शन चे संचालक संदिप पवार यांनी प्रकल्पा विषयी अधिक माहिती दिली.
आधुनिक सुविधांसह १ आणि २ बीएचकेचे आलिशान फ्लॅट्स
’श्री कृष्णा हाईट्स’ हा प्रकल्प अत्याधुनिक जीवनशैली आणि उत्कृष्ट बांधकाम गुणवत्ता यांचा समन्वय साधणारा आहे. या गृहप्रकल्पात मध्यमवर्गीय नागरिक व कामगारांसाठी १ बीएचके आणि २ बीएचकेचे आलिशान फ्लॅट्स उपलब्ध करण्यात आले आहेत.
प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये:
२४x७ सीसीटीव्ही प्रणाली,रहिवाशांच्या सुरक्षिततेसाठी संपूर्ण प्रकल्पात चोवीस तास सुरक्षा व्यवस्था,
फ्लॅट धारकासाठी स्वतंत्र पार्किंग, निश्चित, सुव्यवस्थित वाहनतळाची सोय,
कॉमन एरिया साठी सौर ऊर्जा सोलर प्रणाली, वीज बचत, पर्यावरणपूरकतेसाठी सौर ऊर्जेचा वापर.
सदर गृहप्रकल्प नाशिकच्या अशोकनगर, सातपूर येथील सर्वे नं. २७, पवार संकुल शेजारी, १०० फूट डीपी रस्त्यावर, शिंदे मळ्याजवळ या मध्यवर्ती ठिकाणी हा प्रकल्प उभारला जात असून, उत्तम कनेक्टिव्हिटी आणि आधुनिक सुविधांमुळे हा प्रकल्प गृह खरेदीदारांसाठी एक आकर्षक आणि सुरक्षित पर्याय ठरत आहे.संपर्क आणि माहिती
आपल्या स्वप्नातील घराची बुकिंग करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी इच्छुक ग्राहकांनी खालील क्रमांकांवर संपर्क साधावा.
७५०७०९ ०३५५
७५०७०९ ५७५५
’श्री कृष्णा हाईट्स’ – तुमच्या आधुनिक जीवनाची नवी उंची!
