नाशिक मिरर वृत्तसेवा:
कडेपठार चौक येथे असलेल्या श्री दक्षिणमुखी महाबली हनुमान मंदिराचा द्वितीय वर्धापन दिन सोहळा गुरुवार, २२ जानेवारी २०२६ रोजी भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने दिवसभर विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी ६.०० वाजता श्री हनुमानरायांचा अभिषेक व ध्वज स्थापना होणार आहे. त्यानंतर सायंकाळी ५.०० ते ७.०० वाजेपर्यंत शिवाजीनगर येथील श्री गजानन महाराज भजनी मंडळ यांचे हरिपाठ आयोजित करण्यात आला आहे. सायंकाळी ७.०० ते ७.३० वाजता महाआरती व प्रसाद होणार असून, रात्री ८.३० ते १०.३० वाजेपर्यंत कीर्तन सोहळा पार पडणार आहे.
या कीर्तन सेवा भागवताचार्य ह. भ. प. मुरुकुटे महाराज, (आळंदी देवाची) यांचे कीर्तन होणार आहे. भाविकांनी या भक्तिसोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
हा सोहळा दक्षिणमुखी महाबली हनुमान मंदिर, कडेपठार चौक, श्रमिकनगर, सातपूर येथील भाविक भक्तांच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे.
