नाशिक मुख्यालयातून जागतिक व्यापाराचे नेतृत्व; भारतात १५० हून अधिक रोजगार, आंतरराष्ट्रीय पाहुण्यांच्या उपस्थितीत ग्लोबल कॉर्पोरेट गाला नाईट संपन्न.”
आंतरराष्ट्रीय सांज पाडवा संपन्न
नाशिक मिरर वृत्तसेवा : नाशिकच्या औद्योगिक आणि व्यावसायिक क्षेत्राला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळवून देणाऱ्या मेगामॉन्ट ग्रुपच्या वतीने आंतरराष्ट्रीय पाहुणे, जागतिक व्यावसायिक भागीदार आणि मान्यवरांच्या उपस्थितीत ‘ग्लोबल कॉर्पोरेट गाला नाईट २०२६’चे आयोजन ग्रेप काउंटी, नाशिक येथे दिमाखात करण्यात आले. नाशिकमधून सुरू झालेल्या एका व्यावसायिक प्रवासाने आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतलेली झेप आणि जागतिक बाजारपेठेत निर्माण केलेली स्वतंत्र ओळख या सोहळ्याच्या माध्यमातून अधोरेखित झाली.
जागतिक संधी भारतात आणणे आणि भारतीय उत्पादनांना जगभरातील बाजारपेठ उपलब्ध करून देणे, या दूरदृष्टीतून मेगामॉन्ट ग्रुपच्या व्यवसायाची सुरुवात झाली. आज या समूहाने भारतासह अनेक देशांमध्ये आपले व्यावसायिक जाळे विस्तारले असून, भारतात १५० हून अधिक लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. रशिया, दुबई, चीन आणि मोरोक्को यांसारख्या देशांमध्ये समूहाचे आंतरराष्ट्रीय व्यावसायिक संबंध विस्तारले आहेत.
भारतात मुंबई, हैदराबाद, राजस्थान, दिल्ली आणि अहमदाबाद यांसारख्या प्रमुख व्यावसायिक केंद्रांमध्ये समूहाची कार्यालये व व्यावसायिक उपस्थिती असून, या संपूर्ण व्यवसायाचे मुख्यालय नाशिक येथे आहे. विशेष म्हणजे, जागतिक स्तरावर व्यवसायाचा विस्तार करतानाही समूहाने आपले मुख्यालय नाशिकमध्येच ठेवले आहे. त्यामुळे नाशिकमधून जागतिक व्यवसाय उभारणीचे एक प्रेरणादायी उदाहरण समोर आले आहे.
नाशिकच्या मातीतून उदयास आलेल्या या समूहाचे संस्थापक आज दुबईतून जागतिक व्यावसायिक विस्ताराचे नेतृत्व करत आहेत. त्यांच्या विशेष पुढाकाराने या सोहळ्यासाठी परदेशी पाहुणे आणि आंतरराष्ट्रीय व्यावसायिक भागीदारांची उपस्थिती लाभली. यामुळे नाशिकच्या व्यावसायिक क्षमतेला आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळाल्याचे चित्र या सोहळ्यातून पाहायला मिळाले.
या कार्यक्रमाचे आयोजन मेगामॉन्ट ग्रुपचे संचालक दीपक आव्हाड व ओम पाटील यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरला तो समूहाच्या नेतृत्वाचा जागतिक व्यावसायिक दृष्टिकोन आणि भविष्यातील विस्ताराचा संकल्प. समूहाचे संस्थापक व नेतृत्वकर्ते गौरव पाटील, मीनल पाटील, दीपक आव्हाड, अनिल चव्हाण आणि निलेश विधाते यांनी आंतरराष्ट्रीय पाहुणे व व्यावसायिक भागीदारांशी संवाद साधताना समूहाच्या आजवरच्या वाटचालीचा आढावा घेतला. जागतिक बाजारपेठेतील संधींचा शोध, आंतरराष्ट्रीय व्यापाराचे नवे मार्ग, भारतीय उत्पादनांना जागतिक व्यासपीठ आणि देशात रोजगारनिर्मिती या महत्त्वपूर्ण विषयांवर त्यांनी आपली भूमिका मांडली.
नाशिकला केंद्रस्थानी ठेवून आंतरराष्ट्रीय व्यापाराचे अधिक व्यापक जाळे निर्माण करणे, भारतीय उद्योग आणि जागतिक बाजारपेठ यांच्यात प्रभावी व्यावसायिक दुवा निर्माण करणे आणि आगामी काळात समूहाची जागतिक व्याप्ती अधिक विस्तारण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
यावेळी शुभांगी पाटील, डॉ. रमाकांत पाटील आणि सुधाकर आव्हाड यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. उपस्थित आंतरराष्ट्रीय पाहुणे, व्यावसायिक भागीदार आणि मान्यवरांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
नाशिकमधून जागतिक बाजारपेठेपर्यंतचा प्रवास केवळ एका उद्योगसमूहाच्या यशाची कहाणी नसून, नाशिकच्या उद्योजकीय क्षमतेची आणि भारतीय व्यवसायाच्या जागतिक महत्त्वाकांक्षेची साक्ष देणारा आहे. मेगामॉन्ट ग्रुपची ही वाटचाल नाशिकच्या औद्योगिक आणि व्यावसायिक क्षेत्रासाठी निश्चितच अभिमानास्पद ठरत आहे.