न्यूज चॅनल च्या जुन्या बातम्या व्हाट्सएप वरून केल्या जात आहे फॉरवर्ड
सातपूर :नाशिक मिरर वेबटीम
नाशिक शहरात आजपासून २२ नोव्हेंबर पासून कर्फ्यु लागू करण्यात आल्याची खोटी बातमी व्हाट्स ऍप, फेसबुक वरून शेअर केली जात आहे.शहरात कोणत्याही प्रकारचा कर्फ्यु लागू होणार नसल्याचे नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक मिरर शी बोलतानी सांगितले असून नागरिकांनी अफवा वर विश्वास ठेवू नका असे आव्हान देखील केले आहे.खोटी बातम्या व्हायरल करण्यावर सायबर क्राईम अंतर्गत शोध घेण्यात येणार असून अशा वर करवाई देखील करण्यात येणार आहे.असे नाशिकचे पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी सांगितले आहे. सदर व्हायरस बातमी ही जुनी असून कोणी व्हायरल करू नये असे नागरिकांना नाशिक मिरर वेबटीम आव्हान करीत आहे.

बातम्या

Don`t copy text!