नाशिक मिरर वेबटीम : राज्यातील निःशस्त्र पोलिस उपअधीक्षक- सहाय्यक आयुक्त संवर्गातील बारा अधिकाऱ्यांच्या गृह विभागाने बदल्या केल्या आहेत. त्यातील दोन अधिकारी नाशिक जिल्ह्यास लाभले असून, मालेगाव शहराच्या उपविभागीय पोलिस अधिकारीपदी मुंबईच्या सहाय्यक आयुक्त लता दोंदे यांची वर्णी लागली आहे.
राज्यातील १२ डीवायएसपींच्या बदल्या
राज्य पोलिस सेवेतील पोलिस उपअधीक्षक- सहाय्यक आयुक्त (नि:शस्त्र) या संवर्गातील बारा अधिकाऱ्यांच्या बुधवारी (ता. ६) गृह विभागाने बदल्या केल्या. ठाणे येथील नागरी हक्क संरक्षण दलाचे उपअधीक्षक शांताराम वळवी यांची बदली नाशिक महामार्ग सुरक्षा पोलिस उपअधीक्षकपदी करण्यात आली, तर मुंबई शहराच्या सहाय्यक आयुक्त लता दोंदे यांची मालेगाव शहराच्या उपविभागीय पोलिस अधिकारीपदावर वर्णी लागली आहे.मालेगाव येथील उपविभागीय अधिकारीपद गेल्या अनेक दिवसांपासून रिक्त होते.
