नाशिक मिरर वेबटीम : भाजपला नाशिकमध्ये अजून तिसरा मोठा धक्का बसला असून भाजपचे जेष्ठ व प्रचंड जनसंपर्क असलेले नाशिक महानगरपालिकेचे भाजपा चे प्रभाग क्रमांक ९ चे नगरसेवक तथा माजी मनपा सभागृह नेते दिनकर धर्माजी पाटील हे देखील शिवधनुष्य हाती घेऊन शिवबंधन बांधणार असल्याची चर्चा नाशिक जिल्ह्यात होत असून, भाजपा अजून एक हेवी वेट नगरसेवक गमावत आहे. पाटील यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची द्वारा दरम्यान भेट घेतली व याबाबत चर्चा देखील केली असल्याचे समजते आहे. या भेटीमुळे दिनकर पाटील यांचा सेनेत प्रवेशावर शिक्कामोर्तब झाल्याचे समजत आहे.नगरसेवक दिनकर पाटील यांचा नाशिक शहरात सर्व पक्षाची चांगले संबंध असून त्याचा सातपूर व नाशिक शहरात मोठा चाहता वर्ग आहे.प्रभागात केलेल्या विकास कामा मुळे ज्या पक्षात ते निवडणूक लढवतील तेथून हमखास विजयी होतील अशी त्याची प्रतिमा आहे.मागील पंचवार्षिक निवडणुकीत त्यांनी प्रभागातील ३ नवख्या उमेदवाराना निवडून आणले होते.तसेच नाशिक मनपा मध्ये भाजपा ची सत्ता येण्यासाठी त्याची महत्वाची भूमिका होती.विधानसभा निवडणुकीत देखील आमदार सीमा हिरे यांना मदत करून विजयश्री खेचुन आणली होती.परंतु देहबोली व कामगिरी मध्ये सुस्पष्ट स्वतंत्र विचार सरणी चे असल्या मुळे त्याचे भाजपा मधील स्थानिक पदाधिकारी यांच्या सोबत नेहमी वाद होत असत.नाशिक महापालिकेच्या सभागृह नेते पदाची जबाबदारी भाजपा ने त्याच्याकडे सोपवली होती.परंतु त्याच्या कठोर व विकसनशील कार्यपद्धती मुळे भाजपा ला अनेकदा तोंडघशी पडावे लागत असे.त्यामुळे त्यांना सभागृहनेते पदावरून पायउतार देखील व्हावे लागले होते.तेव्हा पासून भाजप त्यांना महत्वाचा निर्णय पासून दूर ठेवत होते.त्यामुळे दिनकर पाटील हे भाजपा च्या कार्यपद्धती प्रचंड नाराज होते. त्याची नाराजी आता त्याचा शिवसेने मध्ये पक्ष प्रवेशानी दिसून आली असून ते शिवसेना मध्ये प्रवेश करणार की नाही,दिनकर पाटील यांच्या या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. नाशिक महानगर पालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपला एकापाठोपाठ आता तिसरा धक्का बसला आहे वसंत गीते सुनिल बागुल यांच्या पाठोपाठ भाजपचे माजी सभागृह नेते दिनकर पाटील सुद्धा सेनेच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. दिनकर पाटील हे आपल्या 11 समर्थक नगरसेवकांसह सेनेत प्रवेश करणार आहे. त्यामुळे नाशिकमध्ये सत्तेत असलेले भाजप अल्पमतात जाण्याची शक्यता आहे. दिनकर पाटीलही सेनेच्या तंबूत दाखल होणार आहे. दिनकर पाटील यांनी भाजपच्या 4 नगरसेवकांसह प्रवेश करणार असल्याचे संकेत दिले आहे.
दिनकर पाटील यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. या भेटीमुळे दिनकर पाटील यांचा सेनेत प्रवेशावर शिक्कामोर्तब झाल्याचे समजत आहे. एवढंच नाहीतर भाजपचे 11 विद्यमान नगरसेवक सुद्धा सेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. त्यामुळे सभागृहात, सत्ताधारी भाजप अल्पमतात जाण्याचे संकेत मिळत आहे. हा भाजपला सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.
