शिवपूजनासाठी रामशेज किल्ल्यावरील माती आणणार

नाशिक मिरर वेबटीम: शिवजयंतीचे औचित्य साधत सातपूरकरांच्या वतीने येत्या 19 फेब्रुवारीला शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात येत आहे. दरम्यान, या सोहळा समिती कार्यालयाचे उदघाटन आज शनिवारी शिवप्रेमिंच्या उपस्थितीत करण्यात आले.सालाबादाप्रमाणे १९ फेब्रुवारीला शिवजयंतीनिमित्त अठरा पगड जातींना सोबत घेऊन शिवजन्मोत्सव साजरा करण्याची प्रथा सातपूरकरांनी रुढ केली आहे. त्याअनुषंगानेच यावर्षीही ही प्रथा कायम ठेवत येत्या १९ फेब्रुवारीला एकाच ठिकाणी भव्य दिव्य असा कार्यक्रम साजरा करत शिवजन्मोत्सव साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्त सावरकरनगर येथील पटांगणावर १५० कलाकारांचा समावेश असलेल्या रंगमंचावर शिवरायांच्या जन्मापासून तर राज्यभिषेक सोहळ्यापर्यंतचा शिवशंभो या महानांटयाचे आयोजन करण्यात आले आहे.दरम्यान, आज शनिवारी सकाळी या सोहळा समिती कार्यालयचे उदघाटन फीत कापून करण्यात आले. समितीच्यावतीने संपूर्ण सातपूर परिसरात भगवे ध्वज लावू सुशोभीकरण करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या मुख्य ठिकाणी उंच स्तंभावर भगवा ध्वज लावला जाणार आहे. १८ फेब्रुवारी रात्री परिसरातील महिलांच्या उपस्थितीत शिवरायांचा पाळणा संपन्न होणार आहे. समितीच्या वतीने शिव पूजनासाठी यावर्षी संभाजी महाराजांचे शौर्य सांगणारा रामशेज किल्ला या ठिकाणाहून माती आणली जाणार असल्याची माहिती समितीच्या वतीने देण्यात आली.यावेळी आ. सिमा हिरे, नगरसेवक दिनकर पाटिल, मधुकर जाधव, योगेश शेवरे, शशी जाधव, नगरसेविका माधुरी बोलकर, शिवजन्मोत्सव समिती अध्यक्ष जी.एस. सावळे, कार्याध्यक्ष कांता शेवरे, नंदू जाधव, निवृत्ती इंगोले, दादा कांडेकर, स्वप्निल पाटील, नितीन निगळ, किशोर निकम,  इंद्रभान सांगळे, लखन कुमावत, समाधान देवरे, महेंद्र शिंदे, दीपक आरोटे,दीपक मौले, विक्रम नागरे, संजय जाधव, डॉ. अमोल वाजे, अमोल पाटील, गोकुळ नागरे, नरेश सोनवणे, बाळासाहेब जाधव, सुरेश खांडबहाले,शिवाजी शिंदे,अमोल इंघे, आदींसह सर्वपक्षीय पदाधिकारी व  शिवप्रेमी उपस्थित होते.

बातम्या

Don`t copy text!