नाशिक मिरर : सातपूर भागात घंटागाडी पार्किंगला नवीन जागा मिळाली असून यासाठी पाठपुरावा करणारे प्रभाग ११ चे नगरसेवक सलिम शेख व योगेश शेवरे यांचा घंटागाडी कर्मचाऱ्यांनी सत्कार केला.
महापालिकेने घरोघरी जात कचरा संकलन करण्यासाठी घंटागाडी अभिनव योजना राबविली आहे. परंतु त्याच घंटागाडीवर काम करणा-या कामगारांना आरोग्याची
कुठहीली सुविधा दिली जात नसल्याचे कामगार सांगतात.
याप्रसंगी नगरसेवक शेख यांनी घंटागा़डी कामगारांच्या आरोग्य तपासणीची महापालिका आयुक्तांकडे मागणी करणार असल्याचे सांगितले. गेल्या अनेक वर्षांपासून घंटागाडी कामगारांना आरोग्य सुविधा दिल्या जात नाही. यामुळे अनेकांना प्राणही गमवावे लागले आहेत. याबाबत पाठपुरावा करणार असल्याचे नगरसेवक शेवरे म्हणाले.
दरम्यान सातपूर भागात घंटागाडी पार्किंग ईएसआय च्या सातपूर क्लब हाऊस व जॉगिंग ट्रक येथील मैदानाच्या बाजूला घंटागाडी पार्क केली जात होत्या.पंरतु मैदानावर व्यायाम व जॉगिंग करण्यासाठी येणाऱ्या नागरिक यांनी घंटागाडी चा वास सदर भागात पसरत असल्याच्या कारणाने सदर घंटागाडी ची पार्किंग हलविण्याची मागणी केली होती.त्यावर सुविधा नसल्याने शहरातील द्वारका परिसरातील कन्नमवार पुलाच्या बाजूला खाजगी जागेवर घंटागाडी पार्क
कराव्या लागत होत्या. परंतु यात घंटागाडी कामगारांना पहाटे पाचवाजेला घरातून बाहेर पडत वेळेवर पोहचावे लागत होते. यात अधिक वेळ घंटागाडी कामगारांचा जात असल्याने सातपूर भागातच पार्किंगची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी कामगारांनी केली. यासाठी नगरसेवक शेख व शेवरे यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यावर सातपूर भागात नव्याने घंटागाडी पार्किंगसाठी व्यवस्था
करण्यात आली असल्याने कामगारांनी आनंद व्यक्त केला. पार्किंगच्या ठिकाणी घंटागाडी स्वच्छता करण्यासाठी पाण्याची व्यवस्था जागा मालकाने उपलब्ध करून द्यावी अशी मागणी कामगारांनी केली. याप्रसंगी शरद आहिरे, शाम प्रधान, राजु विटकर, गौतम नेटावटे, नितिन सोनकांबळे, रवी पगारे, संतोष शिंदे यांसह घंटागाडी कामगार उपस्थित होते.आज दिनांक १७ मार्च रोजी सातपूर घंटागाडी पार्किंग येथे सलीम शेख व योगेश शेवरे यांचा घंटागाडी कर्मचाऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.तसेच अनिल मौले, सुनिल मौले व सतीश काळे ह्यांनी सुद्धा कामगारांना पाठिंबा दिला.तसेच घंटागाडी कर्मचाऱ्यांच्या समस्या यापुढे सोडविण्यात येतील असे सलीम शेख व योगेश शेवरे यांनी सत्कार प्रसंगी आश्वासन दिले.
तसेच सातपूर कामगारांच्या वतीने शरद आहिरे, शाम प्रधान, राजु विटकर, गौतम नेटावटे, नितीन सोनकांबळे, विजय गांगुर्डे, रवी पगारे, संतोष शिंदे, अनिल विटकर, गणेश काळे यांनी कार्यक्रमाला परिश्रम घेतले.
घरोघरी कचरा संकलन करणा-या घंटागाडी कामगारांना आरोग्य सुविधा महापालिकेने दिली पाहिजे. याबाबत महापालिका आयुक्तांकडे मागणी करणार आहे.घंटागाडी कामगारांच्या आरोग्याची काळजी घेणे महापालिकेचेही जबाबदारी आहे.
-सलिम शेख, नगरसेवक तथा स्थायी समिती सदस्य नाशिक मनपा
