नाशिक मिरर : शिवाजीनगर परिसरातील कार्बन नाका येथे रस्त्याच्या कडेला बसलेल्या भाजी विक्रेत्यांना वीज पुरवठा देऊन एका पान टपरीच्या चालकाने लाखाे रुपयांची कमाई करुन भाजी विक्रेत्यांसह वीज वितरण कंपनीला जाेरदार झटका दिला अाहे. विशेष म्हणजे यासाठी त्याने चक्क पाच बाय पाच अाकाराच्या पान स्टाॅल मध्ये वीज वितरण कंपनीकडून थ्री फेज चे कनेक्शन घेतले अाहे.
काेराेना या जागतिक महामारीच्या काळात अनेकांचे राेजगार बुडाले. त्यामुळे उपजिविकेसाठी बहुतांश लाेकांनी भाजीपाल्यासह वेगवेगळ्या व्यवसायात उडी घेऊन अापला उदर निर्वाह भागवण्याचा मार्ग निवडला अाहे. अशाच प्रकारे शिवाजीनगर परिसरात ठिकठिकाणी बसणाऱ्या भाजी विक्रेत्यांवर महापालिकेच्या वतीने नेहमीच अतिक्रमणाची कारवाई केली जात हाेती. यावर ताेडगा काढण्यासाठी प्रभागाचे नगरसेवक दिनकर पाटील यांनी सर्व भाजी विक्रेत्यांना कार्बन नाका येथे कार्बन कंपनीच्या भिंतीलगत जागा उपलब्ध करुन दिली. तेव्हापासून या ठिकाणी एकाच रांगेत भाजी विक्रेते व दुसऱ्या बाजुला मासे विक्रेते अापअापला व्यवसाय करत अाहे. विशेष म्हणजे रहदारीला अडथळा हाेऊ नये याबाबतची काळजी देखील नगरसेवक पाटील यांनी घेऊन या व्यावसायिकांना चांगली संधी मिळवून दिली अाहे. मात्र याचा फायदा अाता काही ‘संधीसाधू’ घेऊ लागले अाहेत. याचाच एक भाग म्हणून एकाने तर चक्क पान टपरीच्या नावावर थ्री फेज कनेक्शन घेतले असून त्यामाध्यमातून त्याने भाजी विक्रेत्यांसाठी कार्बन कंपनीच्या भिंतीलाच विद्युत जाेडणी करुन सर्वांसाठी स्वीच उपलब्ध करून दिले अाहे. या माेबदल्यात एका विक्रेत्याकडून एका एलइडी बल्बसाठी १५ तर दाेन बल्बसाठी ३० रुपये दरराेजची अाकारणी केली जात अाहे. स्वत:च्या तुंबड्या भरण्यासाठी सुरु केलेल्या या उद्याेगामुळे भाजी विक्रेत्यांच्या सुरक्षिततेची काेणत्याही प्रकारची काळजी घेण्यात अालेली नाही. त्यामुळे एखादी दुर्घटना घडल्यास जबाबदार काेण? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित हाेत अाहे.
चाैकट – लाखाेंची वसुली महावितरणची मात्र बाेळवण
एका भाजी विक्रेत्याकडून दिवसाला ३० रुपये अर्थातच एका महिन्याला ९०० रुपये वसुल केले जातात. या ठिकाणी अशा प्रकारे चारशेहून अधिक व्यावसायिक असल्याने त्यांच्याकडून लाखाे रुपयांची वसुली करून महावितरणची मात्र काही हजारांतच बाेळवण केली जात अाहे. सदर अनधिकृत वीज कनेक्शन देणाऱ्या चे कनेक्शन कट केले आहे.परंतु अद्याप कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात न आल्याने वीज वितरण कंपनी च्या अधिकाऱ्या वर नागरिकांनी संशय व्यक्त केला असून संबंधितावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

 

बातम्या

Don`t copy text!