नाशिक मिरर : सातपूर  परिसरात विश्व हिंदू सेनेचे संस्थापक अँड.महेंद्र शिंदे यांच्या वतीने आयोजित शिबिरात रेशनकार्ड वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला.
             सदगुरु नगर येथील हनुमान मंदिरात या रेशनकार्ड वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
               अनेक नागरिक नव्याने येऊन स्थानिक झाले आहे.जुन्या व नव्या नागरिकांना शासकीय कार्यालयात शासकीय सुविधा मिळण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.यासाठी नागरिकांना शासकीय सुविधा लवकरात लवकर मिळाव्या यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या  आयोजित शिबिरात आपले रेशन कार्ड नवीन करणे,आधार कार्ड, पँन कार्ड,जेष्ठ नागरिक दाखला,आयुष्य मान भारत योजना आदीसह अनेक  शासकीय कामे करण्यात आली होती.
             यावेळी अमोल इघे, दीपक आरोटे,सतिश घैसास,सचिन काठे,जितू उगले,अँड.निलेश पाटील,अँड. विशाल जाधव,कपिल अहिरे,संदीप भंदुरे,डाँ.अमोल वाजे, धीरज खोळंबे,प्रमोद पांडे,दीपक सूर्यवंशी,अयोध्या यादव,ग्यान सिंग,सुजित यादव,राजमन यादव,शिव कुमार पांडे,आनंद पाटील, सिद्धू खोचे,अर्जुन शिंदे,दत्ताजी ढोकळे,शैलेश सावजी ,विशाल साळवे,अक्षय लोंढे,अमित कुमार,शिवम तिवारी,शुभम शिंदे,राजा परदेशी,अभिषेक मिश्रा,शुभम क्षिरसागर,संदिप गोसावी,
सुधिर सिंग,प्रसाद वाघ,प्रशांत सहाणे,मनोज वाळुंज. परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 रेशन कार्ड संदर्भात नागरिकांना रेशन कार्ड कार्यालयाच्या चकरा माराव्या लागतात.कागदपत्राची पूर्तता नसल्याने व अपुऱ्या माहितीमुळे कुटुंबांचे रेशन कार्ड दुरुस्त होत नाही.विश्व हिन्दू सेना यांच्या वतीने प्रत्येक घरात जाऊन नागरिकांना त्यांच्या रेशनकार्डसह शासकीय योजना संदर्भातील अडचणी जाणून घेऊन त्या शिबिरामार्फत प्रश्न सोडविला —महेंद्र शिंदे,विश्व हिंदू सेना संस्थापक 

बातम्या

Don`t copy text!