नाशिक मिरर : येथील कामगार नगर परिसरातील तरुणाने जॉगिंग ट्रक जवळील निलगिरीच्या झाडाला दि.१ रोजी पहाटे पाचच्या सुमारास साडीच्या पदराने गळफास लावून आत्महत्या केली असल्याची घटना सकाळी उघडकीस आली.
रामकृष्ण पांडूरंग ढगे (३२) असे गळफास घेतलेल्या मृत तरुणाचे नाव आहे. संत कबीर नगर लगतच्या महापलिकेच्या जॉगिंग ट्रक लगत असलेल्या निलगीरीच्या वृक्षाच्या फांदीला गळफास घेतल्याच्या अवस्थेत नागरिकांना आढळून आले.आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. या घटनेची खबर मच्छींद्र रामचंद्र घाडगे यांनी सातपूर पोलीसांना दिली होती.
पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.आधिक तपास पोलिस नाईक सिध्दपुरे करीत आहे.
