नाशिक मिरर : नाशिक महापालिकेच्या शिवसेना पक्षाच्या नगरसेविका कल्पना चंद्रकांत पांडे यांचे रविवारी पहाटे निधन झाले. गेल्या दोन टर्म पासून त्या शिवसेनेच्या नगरसेविका म्हणून काम पाहत होत्या. त्याचे पती चंद्रकांत पांडे हे देखील नगरसेवक होते. त्यांच्यानंतर कल्पना पांडे या सिडको विभागातील प्रभाग क्रमांक २४ च्या नेतृत्व करत होत्या.

स्थायी समिती असो की महासभा या सभांमध्ये त्या पोटतिडकीने आपल्या प्रभागातील तसेच नाशिक शहरातील प्रश्न मांडत असे. शिवसेना पक्षातील नगरसेविकांपैकी पांडे या एकमेव नगरसेविका होत्या ज्या जनतेच्या प्रश्नावर अधिकाऱ्यांना घाम फोडत असे. त्यांच्या पश्चात पती, मुलगी आणि मुलगा असा परिवार आहे. त्या माजी महापौर विनायक पांडे यांच्या भावजाई होत्या.

बातम्या

Don`t copy text!