नाशिक मिरर :

जुन्या नाशिक मधील इगतपुरीवाला चाळीमागील संजरीनगर सोसायटीतील फ्लॅटमध्ये गॅस सिलिंडर बदलताना गॅसगळती होऊन झालेल्या सिलिंडरचा स्फोटातील मृत्यू संख्या आता सातवर गेली आहे.आज रविवारी (दि. ११) मुस्कान वलीऊल्लाह अन्सारी (२१) हिचा रुग्णालयात उपचार दरम्यान मृत्यू झाला. नणंद भावजयीसह चार सख्ख्या भावांचा व एका बहिणीचा असे सात जणांचा बळी या दुर्घटनेत गेला.

गैस सिलिंडर स्फोट दुर्घटनेतील एकमेव उरलेली मुलीचा देखील आज रविवारी मृत्यू झाल्याने दुर्घटनेतील सर्व जळालेल्या जखमींचे मृत्यू झाले आहे. गैस सिलिंडर स्फोटात रहीम सय्यद व वलिऊल्लाह अन्सारी यांच्या कुटुंबातील सात व्यक्ती गंभीररित्या जळुन जखमी झाले होते. उपचारार्थ रुग्णालयात दाखल असताना घटनेच्या नऊ दिवसात एका पाठोपाठ मृत्यू झाले. काल दोन सख्ख्या भावांचा मृत्यूची आज रविवारी बहिण मुस्कान वलिऊल्लाह अन्सारी (२१) हिचे उपचार दरम्यान रुग्णालयात मृत्यू झाले.

बातम्या

Don`t copy text!