केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन
नाशिक मिरर :  
      सातपूर – अंबड औद्योगिक वसाहतीचा गेल्या अनेक वर्षांपासून झपाट्याने विकास होत आहे. वाढत्या औद्योगिक विकासासह या भागात कामगार वसाहती वाढल्या आहेत. कामगार वसाहतीमध्ये काम करणारे कर्मचारी, उद्योजक तसेच ट्रासपोर्ट मुळे २४ तास या नाशिक – त्र्यंबकरोड वर नेहमी रहदारी असते.  तसेच मोठ्या संख्येने भाविक त्र्यंबकेश्वरला जात असल्याने शहरातून जाणाऱ्या त्र्यंबकेश्वर रोडवरील वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. अनेक मोठे कंटेनर सातपुर गावातून जातात त्यामुळे आजपर्यंत अनेक अपघात झाले आहेत.त्यामुळे त्र्यंबक रोड वरील आयटीआय सिग्नल ते पप्पया नर्सरी दरम्यान होणारी वाहतूकीची कोंडी सोडवण्यासाठी  आयटीआय सिग्नल ते पपया नर्सरी दरम्यान उड्डाणपूल बांधण्याची सातपुर गावातील नागरिकांकडून ही मागणी सातत्याने होत आहे.
         त्यामुळे नाशिक पश्चिम च्या आमदार सीमा हिरे यांनी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री  नितीन गडकरी यांची भेट घेवून नाशिकमधील  नाशिक शहरातून जाणाऱ्या त्र्यंबकेश्वर रोडवरील आयटीआय सिग्नल ते पप्पया नर्सरी दरम्यान उड्डाणपूल बांधण्यास विभागाकडून मंजुरी मिळावी आणि उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी निधी मंजूर करावा. अशा विनंतीचे निवेदन देण्यात आले. यावर नितीन गडकरी यांनी सदरचे कामास तत्व:ता मान्यता दिली असून लवकरच सदरच्या कामाची निविदा प्रक्रिया सुरु करण्यात येईल असे आश्वासन आ.सीमा हिरे यांना दिले आहे.

बातम्या

Don`t copy text!