नाशिक मिरर :

वृक्ष आपल्याला निस्वार्थपणे मोफत प्राणवायू ऑक्सिजनचा पुरवठा मानवास अविरतपणे देते आहेत.परंतू मानवच आता या वृक्षांमुळावर उठला असून सिमेंट जंगल उभे करण्यासाठी सरास वृक्ष तोंड केली जात आहे.रस्ते रुंदीकरण साठी अडथळे ठरणारे वृक्ष हरवले जात आहे.यामुळे शहरात वृक्षांची संख्या लाक्षणिक कमी होत आहे. कोरोना काळात ऑक्सिजन अभावी अनेकांचे प्राण कंठाशी आले होते.

विश्व हिंदू सेनेच्या वतीने वृक्षांचे महत्व मानवी जीवनात किती जीवनाआवश्यक आहे हे, सांगण्यासाठी “वृक्षाबंधन” साजरे करण्यात आले त्यानिमित्ताने सातत्याने व निस्वार्थपणे प्राणवायू देणाऱ्या वृक्षांना राखी बांधून वृक्षारोपणाची, वृक्ष रक्षणाची व वृक्ष संवर्धनाची शपथ उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने घेण्यात आली.कोरोना काळात प्राणवायूच्या भासलेल्या कमतरतेमुळे कित्येक लोकांना आपले प्राण गमवावे लागले
या निमित्ताने जास्तीत-जास्त प्राणवायू देणारे वृक्ष व स्वच्छ पर्यावरणाची किती आवश्यकता आहे याची जाणीव होते. यावेळी “बंधन राखीचे नाते श्वासाचे”असा संदेश देण्यात येऊन नाशिक शहरात प्राणवायू देणाऱ्या वृक्षांची लागवड करू असा प्रण विश्व हिंदू सेनेच्या कार्यकर्त्यांच्या वतीने घेण्यात आला.
यामुळे वृक्षांचे महत्व पडून देण्यासाठी विश्व हिंदु सेनाचे संस्थापक अध्यक्ष अँड महेंद्र शिंदे व सातपूर भाजपा मंडळ अध्यक्ष अमोल इघे यांनी रक्षाबंधनच्या दिवशी झाडांना राखी बांधून वृक्षांचे संवर्धन करण्याचा अनोखा संदेश नागरिकांना दिला. यावेळी डॉ अमोल वाजे, धीरज खोळंबे, शिवकुमार पांडे, भाऊसाहेब शिंदे, विशाल साळवे पाटील ,आंनद पाटील ,सिद्धू खोचे ,दत्ता ढोकळे ,महेंद्र पवार, प्रमोद पांडे ,अक्षय लोंढे ,कल्ली सिंग, अमित कुमार, मयूर हेदुकार ,शुभम शिंदे, प्रसाद वाघ ,दिनेश खाटेकर ,कयुम पठाण, सूनय मराठे ,राजा परदेशी, प्रशांत सहाणे, सुधीर सिंग ,राज गांगुर्डे, भावेश पाटील, प्रमीत कुमार ,शंकर गुप्ता, ऋषी , शिवम सिंग, नितीश यादव, मयूर वाघ ,राजू थोरे, चंद्रकांत बच्छाव,ज्ञानेश्वर जगताप आदी सह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातम्या

Don`t copy text!