नाशिक मिरर :सातपूर प्रतिनिधी राजू अनमोला
‘गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर’ ‘एक-दोन-तीन-चार गणपतीचा जयजयकार’या जयघोषात लाडक्या गणरायाला भावपुर्ण वातावरणात सकाळ पासूनचं सायंकाळी उशिरा पर्यंत सातपूर , गंगापूर, अंबड व शहर परिसरातील गणेश भक्तांनी निरोप दिला.
कोरोना महामारी चे संकट असतानांही दहा दिवस गणेश उत्सव उत्साहात संपन्न झाला. त्यामुळे सातपूर औद्योगिक परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.१० दिवसाच्या पाहुन चारानंतर गणरायाला भावपुर्ण वातावरणात निरोप देण्यात आला.यावेळी महापालीकेच्यावतीने गणेश विसर्जनासाठी सातपूर प्रभागात ठिकठिकाणी मुर्ती संकलन केंद्र व कृत्रिम तलाव उभारण्यात आले होते.महापालीकेच्यावतीने गणेश विर्सजनासाठी ,सोमेश्वर धबधबा,अंबड लिंक रोड पप्पया नर्सरी,अशोकनगर,शिवाजी नगर,मते नर्सरी पुल,पाईप लाईन रोड आदी ठिकाणी मुर्ती संकलन केंद्र उभारण्यात आले होते.गणेश विर्सजनासाठी भाविकांची सकाळी तुरळक संख्या होती.गणेश विर्सजनाला दुपार नंतर भाविकांनी गर्दी केली होती.गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या घोषणा देत भाविक साधेपणाने गणरायांचे विर्सजन करण्यासाठी आले आले.यावेळी गणेश मुर्ती नदित विसर्जन करण्यास बंदि असल्याने हजारो भाविकानी मनपाने तयार केलेल्या कृत्रिम तालावात विर्सजन करून मुर्ती दान केल्या.तर काहि गणेश भक्तांनी घरीच मुर्तीचे विसर्जन केले.कोरोना चे संकट लवकरात लवकर जाऊ दे अशी पार्थना भाविकांनी गणरायाला केली.
शिवसेना गटनेते विलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसमर्थ मित्रमंडळाच्या व रोटरी कल्ब आँफ नाशिक वेस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने गणेश मुर्ती संकलनाचा अभिनव उपक्रम राबविण्यात आला.मुर्ती दान करा गोदावरीचे प्रदुषण रोखा असे आवाहन मंडळाच्यावतीने करण्यात येत होते.तसेच मनसे गटनेते सलीम शेख प्रभाग सभापती योगेश शेवरे,सचिन सिन्हा,बंटी लभडे यांनी ही नागरिकांना मुर्ती दान करण्याचे आवाहन केले.
कोरोना विषाणू चा वाढता प्रदुभाव लक्षात घेता राष्ट्रवादी युवक कांग्रेसच्यावतीने घरबसल्या गणेश मुर्ती दान करा व कोरोना टाळा.हा उपक्रम हाती घेण्यात आला होता.सातपुर परिसरात गणपती विसर्जन निमित्त नागरिकांची गर्दी होऊ नये. यासाठी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे पदाधिकारी सातपुर भागामध्ये जागोजागी गाड्या घेऊन मूर्ती संकलन करत होते.या उपक्रमाचा शुभारंभ माजी नगरसेवक सदाशिव माळी,आबा मौले यांच्या हस्ते करण्यात आले.विभागीय अध्यक्ष जीवन रायते,नाशिक शहर उपाध्यक्ष बाळासाहेब जाधव,पश्चिम विधान सभा अध्यक्ष नितीन निगळ,माजी विभागीय अध्यक्ष विजय तुपलोंढे,विभाग कार्याध्यक्ष कल्पेश कांडेकर,शेखर तालखे,विकी कांबळे,गौरव प्रधान,संकेत पाटील,संदिप भागवत,सुनिल कापडणीस,अनिल साळवे,अर्जुन प्रजापती,सोनु साळवे आदीसह राष्ट्रवादी चे पदधिकारी सहभागी झाले होते.स्थानिक नगरसेवकानी देखील आप-आपल्या भागातील भाविकांना मूर्ती संकलन करण्याच्या ठिकाणी उपस्थित राहून मूर्ती संकलन करण्याचे आवाहन करत होते.सातपूर पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर मोरे व गंगापूर चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रियाज शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूर व गंगापूर भागात गणपती विसर्जन व मूर्ती संकलन च्या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त होतो.



